INDvsAUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हार्दिकने रचला इतिहास  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात येत आहे. कोरोनाच्या काळानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरला आहे.  या सामन्यात ऑस्टेलियाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले. मयांक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने भारतीय संघाचा डाव सावरला. 

INDvsAUS : स्मिथची पाचव्यांदा भारताविरुद्ध 'झटपट' शतकी खेळी

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील चांगला खेळ केला. या सामन्यात हार्दिक पांड्याने केवळ 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शिवाय या सामन्यात त्याने 48 वी धाव घेताच नवा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 375 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात म्हणावी तशी झाली नाही. . मयांक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने संघाची पडझड रोखली. हार्दिक पांड्याने शिखर धवनबरोबर डाव सावरलाच नाही तर अर्धशतक देखील झळकवले. आणि यासोबतच त्याने  भारतासाठी इतिहासही रचला.

हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भारताकडून खेळताना सर्वात कमी चेंडूत 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आणि यात त्याने केदार जाधवला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या नावावर आहे. त्याने 767 चेंडूत 1000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर हार्दिक पांड्याने 857 चेंडूत ही कामगिरी केली आहे. तर यापूर्वी केदार जाधवने 937 चेंडूत 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता.     
      


​ ​

संबंधित बातम्या