वर्णभेदाचा खेळ : ''तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम''

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने शांततेत पार पडले. मात्र तिसरा कसोटी चालू असताना असे काही घडले ज्यामुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने शांततेत पार पडले. मात्र तिसरा कसोटी चालू असताना असे काही घडले ज्यामुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर भारतीय संघावर स्टेडियम मधील प्रेक्षकांनी अपशब्दांचा वापर करत चांगलाच हल्ला केला आहे. दर्शकांनी खेळाडूंवर वर्णभेदी टिप्पणी केल्यावर भारतीय संघाने याची तक्रार दाखल केली असून, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने देखील या घटनेचा निषेध करत चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग, माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर यांनी या घटनेवर आपली प्रतीक्रिया दिली आहे. 

सिडनीच्या मैदानात टीम इंडियासोबत घडलेल्या प्रकारावर विराट संतापला

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, ऑस्ट्रेलियातील हा प्रकार नवीन नसल्याचे म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील स्टेडियमवर खेळताना आपण देखील अशा प्रकारच्या शाब्दिक हल्ल्यांचा बळी ठरल्याचा खुलासा हरभजन सिंगने केला आहे. आपल्या या ट्विट मध्ये हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या दर्शकांकडून रंग, धर्म आणि नको त्या गोष्टींबद्दल खेळताना ऐकायला मिळाले असल्याचे सांगितले. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील दर्शकांनी याअगोदर देखील अशा प्रकारच्या गोष्टी केल्याचे संघात, हे कसे रोखणार असा प्रतिप्रश्न देखील हरभजन सिंगने आपल्या या ट्विट मध्ये विचारला आहे. 

हरभजन सिंग नंतर भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट करताना, त्याने ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांना टोला लगावला आहे. ''तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम'', असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. याशिवाय एमसीजीच्या स्टेडियमवर प्रेक्षक जे काही करत आहेत त्यावरून मालिकेचे वातावरण खराब होत असून, हे दुर्देवी असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. 

याशिवाय, भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफरने देखील या घटनेवर कमेंट करताना वीर-झारा सिनेमातील एका गाण्याचा फोटो शेअर केला आहे. वसीम जाफरने नेहमीप्रमाणे कोड लॅंग्वेज मध्ये सॅरकॅझम ट्विट केले असून, या पोस्ट मध्ये वीर-झारा मधील शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या गाण्यातील ओळ लिहिलेला फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये 'मेरे देस में मेहमानो को भगवान कहा जाता हे' अशी ओळ आहे. व यासोबत त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा हॅशटॅग वापरला आहे.  

दरम्यान, टीम इंडियावर झालेल्या वर्णभेदी टिप्पणीवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने माफी मागत चौकशी सुरु केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबतीत निवेदन जारी करण्यात आले असून, यामध्ये एनएसडब्ल्यू पोलिसांनी काही लोकांची चौकशी केली असल्याचे म्हटले आहे. आणि याशिवाय पोलिसांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या या निवेदनात नमूद केले आहे.      

   


​ ​

संबंधित बातम्या