टी नटराजन एक निर्भिड गोलंदाज; वाचा कोण म्हणाले  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याच्या मालिकेवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने, तर टी-ट्वेन्टी मालिकेवर भारतीय संघाने कब्जा केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याच्या मालिकेवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने, तर टी-ट्वेन्टी मालिकेवर भारतीय संघाने कब्जा केला आहे. आणि चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. मात्र आता पर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज यांनी धमाकेदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारतीय गोलंदाज टी नटराजनने चांगली कामगिरी केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर टी -20 मालिकेतील त्याच्या गोलंदाजीचेही सर्वांकडून कौतुक केले जात आहे. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने देखील टी नटराजनची भरभरून स्तुती केली आहे. 

ICC Test Rankings : विल्यमसनने रन मशीन विराटला टाकले मागे  

हरभजन सिंगने टी नटराजनचे कौतुक करताना तो एक निर्भिड गोलंदाज असल्याचे म्हणत, मालिकावीर पुरस्कारासाठी पात्र असल्याचे सांगितले आहे. शिवाय सध्याच्या घडीला टी नटराजन विलक्षण कामगिरी करत असल्याचे हरभजन सिंगने म्हटले आहे. तसेच आपण स्वत: वर विश्वास ठेवल्यास आणि कठोर परिश्रम करत आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास काहीही शक्य आहे हे टी नटराजनवरून सिद्ध होत असल्याचे हरभजन सिंगने पुढे सांगितले. त्याशिवाय नटराजन हा भारतासाठी सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरला असून, भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ राहिल्याचे हरभजनने म्हटले आहे. 

AUSvsIND : कॅमेरून ग्रीनच्या शतकीय खेळीने ऑस्ट्रेलियाची भारतावर बढत  

याव्यतिरिक्त भारतीय संघाला जेंव्हा कधीही विकेटची गरज असते अशावेळी त्याने दमदार कामगिरी केल्याचे हरभजन सिंगने अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकून राहण्याची आणि टीम इंडियाला जिंकवून देण्याची त्याची क्षमता असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. व तो एक आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू असल्याचे हरभजन सिंगने नटराजन विषयी म्हटले आहे. इतकेच नाही तर मालिकावीर म्हणून त्याला पुरस्कार मिळाल्यास त्याचा आत्मविश्वास आणि मनोबल निश्चितच वाढणार असल्याचे हरभजन म्हणाला. 

    


​ ​

संबंधित बातम्या