AUSvsIND : गावस्करांनी सांगितले टीम इंडियाच्या विजयाचे रहस्य 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केल्याने सामना आपल्या खिशात घातला. व त्यासोबतच टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केल्याने सामना आपल्या खिशात घातला. व त्यासोबतच टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने संघात चार बदल केले होते. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे होती. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागेवर युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. त्यानंतर मागील काही सामान्यांपासून धावांसाठी झगडत असलेल्या पृथ्वी शॉला वगळण्यात येऊन शुभमन गिल मैदानात उतरला होता. आणि वृद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला खेळवण्यात आले होते. याशिवाय रवींद्र जडेजाचे देखील संघात पुनरागमन झाले. या चार बदलांपैकी रवींद्र जडेजा, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.  

हिटमॅनच्या आगमनाने टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला जल्लोष; पहा व्हिडिओ  

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत केलेल्या कामगिरीवर भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी भाष्य केले असून, दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला खेळवण्यात आल्याने गावस्कर यांनी संघाच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. रवींद्र जडेजाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 57 धावा करतानाच अजिंक्य रहाणेसोबत चांगली भागीदारी केली होती. तसेच दुसऱ्या डावात जडेजाने अचूक गोलंदाजी केल्याचा भारतीय संघाला फायदा झाला होता. त्यामुळे रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाल्यामुळे संघ संतुलित झाल्याची प्रतिक्रिया सुनील गावस्कर यांनी दिली आहे. 

रवींद्र जडेजा संघात असल्यावर तो संघासाठी एक अतिरिक्त फलंदाज आणि गोलंदाज ठरत असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. याशिवाय जडेजामुळे संघातील मुख्य गोलंदाजांना थोडीफार आराम मिळत असतो. आणि याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा एक जागतिक स्तरावरील फिल्डर असल्यामुळे त्याचा संघाला अधिक फायदा मिळत असल्याचे सुनील गावस्करांनी पुढे सांगितले आहे. यानंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेनेचे कौतुक करताना, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील रहाणेच्या कर्णधारपदाची प्रशंसा केल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. आणि यामुळे आपल्याला देखील आनंद झाल्याचा सुनील गावस्कर यांनी सांगितले. 

AUSvsIND 3rd Test : टीम इंडिया सावधान! वॉर्नर कमबॅक करतोय

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले होते. व या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आणि या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यानंतर आता पुढील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे.       


​ ​

संबंधित बातम्या