विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका   

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघावर चाहत्यांपासून अनेक क्रिकेटपटू देखील चांगलेच नाराज झाले आहेत. शिवाय अनेकांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे. भारतीय संघाच्या  चाहत्यांनी त्याला हटविण्याची मागणी केली असताना, आता भारतीय माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील विराट कोहलीवर चांगलीच टीका केली आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 370 पेक्षा जास्त धावा केल्या. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची फळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाजही विकेट घेण्यास असमर्थ ठरला. त्यानंतर बुमराहचा योग्यप्रकारे वापर न केल्याबद्दल गंभीरने कोहलीच्या कर्णधारपदावर सवाल उपस्थित केला आहे. व याशिवाय कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात  केलेले नेतृत्व सुमार दर्जाची असल्याची टीका गौतम गंभीरने केली आहे. 

त्याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात कोहलीने केलेले नेतृत्व हे समजले नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखायचे असल्यास विकेट घेणे महत्वाचे होते. आणि अशा वेळी तुम्ही प्रमुख गोलंदाजाला फक्त दोन षटक टाकण्यासाठी सांगत असाल तर यामुळे तुमच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केले. 

तसेच नवीन चेंडू असताना प्रमुख गोलंदाजाला दोन षटक टाकून रोखत असाल तर, या प्रकारची कॅप्टन्सी आपल्या बिलकुल समजली असल्याचे गौतम गंभीरने म्हटले. याशिवाय टी 20 सारखा सामना असेल तर ही गोष्ट पटण्यासारखी आहे. मात्र एकदिवसीय सामन्यात असे निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा मोठा फटका संपूर्ण संघाला बसला असल्याचे गंभीरने सांगितले. 

प्रेमाच्या डावाला ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅक्सवेलची अशीही दाद  

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि या परभवाबरोबरच भारताला मालिका देखील गमावण्याची नामुष्की ओढवली. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वॉर्नर, फिंच, लबशेन व मॅक्सवेल यांच्या अर्धशतकीय आणि स्मिथ याने  केलेल्या शतकीय खेळीमुळे भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ  50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2-0 ने वर्चस्व राखले आहे.        


​ ​

संबंधित बातम्या