''बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी'' 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सिडनीतील एमसीजीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सिडनीतील एमसीजीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर यापूर्वीच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्स राखून पराभव केला होता. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला कांगारूंना हरवण्याची मोठी संधी असल्याचे मत टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

AUSvsIND Pink Test : मास्टर ब्लास्टर सचिनकडून मॅकग्रा फाउंडेशनला खास गिफ्ट

ऑस्ट्रेलिया सोबत होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी असल्याचे भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या सामन्यानंतर दबावात असून, भारतीय संघाने याचा फायदा उचलत आगामी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा, असे गौतम गंभीरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी म्हटले आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाला मेलबर्न येथे पराजित केल्यानंतर कांगारूंचा संघ यातून उभारी घेण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळेच भारतीय संघाला आगामी सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची नामी संधी असल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केले. 

याशिवाय, ऑस्ट्रेलियन संघाची बॅटिंग लाईनअप सध्याच्या घडीला सर्वाधिक कमजोर असल्याचे गौतम गंभीरने सांगितले. ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप देखील सध्याच्या घडीला मजबूत असल्याचे गौतम गंभीरने नमूद केले आहे. याव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात ऑस्ट्रेलियन संघाची अशी बॅटिंग लाईनअप कधीच पाहिली नसल्याचे त्याने अधोरेखित केले असून, भारताच्या कसोटी संघातील मोहम्मद शमी, उमेश यादव व इशांत शर्मा हे गोलंदाज नसताना सुद्धा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर धावा करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे टीम इंडियाला विजयाची मोठी संधी असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. 

दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यानंतर आता तिसरा सामना येत्या उद्यापासून खेळवण्यात येणार आहे. व शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा उद्याच्या सामन्यातून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप पहिल्या दोन सामान्यांपेक्षा नक्कीच स्ट्रॉंग राहणार आहे.     


​ ​

संबंधित बातम्या