AUSvsIND : पहिल्याच दौऱ्यात सिराजने मिळवली वाहवाह!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 1 January 2021

ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर याआधीच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मेलबर्न येथे कांगारूंचा  आठ गडी राखून पराभव करत मालिकेची बरोबरी साधली होती.

ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर याआधीच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मेलबर्न येथे कांगारूंचा  आठ गडी राखून पराभव करत मालिकेची बरोबरी साधली होती. दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी दमदार होती. आणि त्यामुळेच भारतीय संघाला विजय मिळवता आला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात कसोटीत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने लक्षणीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधले. 

उपकर्णधार रोहित शर्मा आगामी सामन्यासाठी सज्ज; केला नेटमध्ये कसून सराव 

आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजचे क्रिकेट जगतातून कौतुक होत आहे. त्यानंतर त्याची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी देखील निवड झालेली आहे. यावर आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनी देखील मोहम्मद सिराजची स्तुती केली असून, या दौऱ्यात मोहम्मद सिराज हा भारतीय संघासाठी दमदार गोलंदाज म्हणून सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. तसेच मोहम्मद सिराज हा उत्तम वेगवान गोलंदाज असल्याचे टॉम मूडी यांनी सांगितले.   

टॉम मूडी यांनी मोहम्मद सिराज बद्दल बोलताना, सामान्य पार्श्वभूमीवरुन येणारा खेळाडू प्रथम आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळला आणि नंतर आरसीबीकडून खेळत आता कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि ही आश्चर्यकारक कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिराजने गोलंदाजी करताना अथवा फिल्डिंग करताना प्रत्येक वेळेस धावा वाचवण्याचा आणि संघासाठी विकेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यामुळेच तो एक उत्तम कसोटीपटू असल्याचे मत टॉम मूडी यांनी व्यक्त केले. शिवाय अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी फलंदाजाला रोखण्याचे उत्तम तंत्र मोहम्मद सूरजला आत्मसात असल्याचे टॉम मूडी यांनी पुढे म्हटले आहे. 

AUSvsIND : सिडनी कसोटीवर पुन्हा कोरोनाचे संकट 

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून टी नटराजनचा समावेश करण्यात आला होता. मात्र वरून चक्रवर्तीला देखील दुखापत झाल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत टी नटराजनला खेळवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियासोबतच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि टी-ट्वेन्टी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील मोहम्मद सिराज शमीच्या जागी सिराजला संधी मिळाली. आणि या संधीचे सोने करत त्याने दोन्ही डावात मिळून पाच बळी टिपले होते.  


​ ​

संबंधित बातम्या