"खाया पिया कुछ नही...गिलास तोडा बाराह आना"; सेहवागचा स्मिथला टोमणा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चिवट खेळी करत सामना अनिर्णित राखला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चिवट खेळी करत सामना अनिर्णित राखला. व यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने सिरीज आपल्या खिशात घालण्याची आशा जिवंत ठेवली आहे. कांगारूंसोबत सुरु असलेल्या या मालिकेतील पहिले दोन सामने शांततेत पार पडल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मात्र असे काही पाहायला मिळाल्याने ज्यामुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला. या सामन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सिडनीच्या एमसीजी स्टेडियम मधील प्रेक्षकांनी टीम इंडियावर वर्णभेदात्मक टिप्पणी केल्याची घटना घडली. तर पाचव्या व शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने मैदानावर असे काही केले ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात येत आहे. 

Sydney Test Records: ऑस्ट्रेलियाच्या बाल्लेकिल्ल्यात टीम इंडियाने केली...

तिसऱ्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाचा फलंदाज रिषभ पंत फलंदाजी करत असताना स्टीव्ह स्मिथने पिचवर येत छेडछाड केल्याचे पाहायला मिळाले. रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने लय पकडत धावा करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज कमालीचे वैतागले होते. आणि याचवेळी ड्रिंक्स ब्रेकमध्ये सर्वजण लांब असताना स्टीव्ह स्मिथने हतबलतेच्या भरात पिच वर जाऊन रिषभ पंतने फलंदाजीसाठी केलेले बॅटिंग गॉर्ड मार्क मिटवण्याचा प्रयत्न केला. स्टीव्ह स्मिथने केलेली ही कृती स्टंप मध्ये असलेल्या कॅमेरात कैद झाली नसती तर नवलच. सामना अनिर्णित ठरल्यानंतर सोशल मीडियावरील युझर्सने स्टीव्ह स्मिथच्या या धूर्त खेळीवर जोरदार टीका केली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

AUSvsIND 3rd Test: व्वा रे वाघा! जखमी होऊनही कांगारूंना फोडला घाम!

वीरेंद्र सेहवागने याबद्दल लिहिताना, सर्व प्रकारच्या युक्त्यांचा वापर करून झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने रिषभ पंत फलंदाजी करत असलेल्या बॅटिंग गॉर्डचा मार्क मिटवण्याचा प्रयत्न केला. पण याचा देखील कोणताही फायदा झाला नसल्याचे वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. यासोबतच सेहवागने ऑस्ट्रेलियाच्या आणि स्मिथच्या कृतीवर 'खाया पिया कुछ नही ओर गिलास तोडा बाराह आना,' असे लिहीत पुढे भारतीय संघावर गर्व असल्याचे सेहवागने म्हटले आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार स्टीव्ह स्मिथने केलेली ही कृती नियमबाह्य आहे. आणि त्यामुळे आयसीसी यावर कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर रिषभ पंतने तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात दुखापत झाली असताना देखील दमदार खेळी केली. मात्र फक्त तीन धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. पंतने 118 धावांचा सामना करत 97 धावा केल्या. यावेळेस त्याने तीन उत्तुंग षटकार आणि बारा चौकार खेचले. रिषभ पंतला नॅथन लियॉनने पॅट कमिन्स करवी झेलबाद केले.                   


​ ​

संबंधित बातम्या