AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिका पराभवाची कारणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

ऑस्ट्रेलियासोबतच्या या दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. मात्र भारताला ही मालिका गमवावी लागली.

कोरोनाच्या संकटामुळे मार्च मध्ये भारतीय क्रिकेट संघाला साऊथ आफ्रिकेसोबतची एकदिवसीय मालिका पुढे ढकलावी लागली. व त्यानंतर भारतीय खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीत घेण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत उतरावे लागले. आणि या स्पर्धेनंतरच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. ऑस्ट्रेलियासोबतच्या या दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. मात्र भारताला ही मालिका गमवावी लागली.    

पहिला एकदिवसीय सामना -    

ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडल्याचे पाहायला मिळाले होते. 

नट्टूचं यशस्वी पदार्पण, वॉर्नर खास स्वप्नपूर्तीस मुकला!

पहिल्या एकदिवसीय सामन्यात  375 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात म्हणावी तशी झाली नव्हती. मयांक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने संघाची पडझड रोखली होती. मयांक अग्रवाल (22),  विराट कोहली (21), श्रेयस अय्यर (2) आणि केएल राहुल (12) हे बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍडम झम्पाने शिखर धवनला स्टार्ककडे झेलबाद केले होते. व यांनतर हार्दिक पांड्याला देखील ऍडम झम्पाने स्टार्ककडे झेलबाद केले. शिखर धवनने 86 चेंडूत 74 धावा, तर हार्दिक पांड्याने 76 चेंडूत 90 धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघ 308 धावांपर्यंत पोहचू शकला होता. 

मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अजिबातच रोखता आले नव्हते. मोहम्मद शमीने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान शमीने 59 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 73, सैनीने 83, युझवेन्द्र चहलने 89 आणि रवींद्र जडेजाने 63 धावा दिल्या होत्या. त्यामुळे हे पाचही गोलंदाज पहिल्या सामन्यात महाग पडले होते.  

दुसरा एकदिवसीय सामना - 

यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पुन्हा एकदा साडेतीनशेहून अधिक धावांचा डोंगर उभा केला होता. आणि या डोंगराचा पाठलाग करताना भारतीय संघ 338 धावांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे भारतीय संघातील फलंदाजांनी पुन्हा एकदा त्यांचे काम योग्य रीतीने पार पाडले होते. मात्र या सामन्यात सुद्धा भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियासमोर निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले होते. 

कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी; सचिनचा खास रेकॉर्ड टाकला मागे

पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेट साठी 142 धावांची भागीदारी रचली होती. एरॉन फिंच 60 धावांचे योगदान देऊन माघारी फिरला. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर स्मिथने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले होते. स्मिथने पहिल्या सामन्यात केलेली आक्रमक खेळी तशीच पुढे सुरु ठेवत 64 चेंडूत 104 धावा कुटल्या होत्या. व यानंतर लबूशेन व मॅक्सवेल यांनी अर्धशतकीय खेळी केली होती. मॅक्सवेलने 29 चेंडूत 63 धावा फाटकावल्या होत्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 389 धावा करत भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते.   

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फक्त तीन फलंदाजांना बाद करता आले होते. तर एक फलंदाज धावबाद झाला होता. मोहम्मद शमीने या सामन्यात फिंचला बाद केले होते. तर 73 धावा त्याने दिल्या होत्या. याशिवाय बुमराहला देखील फक्त एकच विकेट घेता आली होती. बुमराहने लबशेनची विकेट घेतली होती. आणि त्याने या सामन्यात 79 धावा दिल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने या सामन्यात एकच षटक टाकले होते व एक विकेट त्याने घेतली होती. याव्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला बळी मिळवता आले नव्हते. नवदीप सैनीने 90, चहलने 71 आणि रवींद्र जडेजाने 60  धावा दिल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला 390 धावांचे लक्ष्य उभारता आले. 

दरम्यान, आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 13 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघावर एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपची वेळ टाळता आली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 302 धावा केल्या होत्या. व त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात सर्वबाद 289 धावांपर्यंतच मजल मारू शकला. जसप्रित बुमराह आणि टी नटराजन या दोघांनीही आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बळी मिळवले. व कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट्स घेतली. तर, भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.                  


​ ​

संबंधित बातम्या