AUSvsIND : जाणून घ्या तिसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  एकदिवसीय मालिकेतून मैदानात उतरला होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  एकदिवसीय मालिकेतून मैदानात उतरला होता. आणि या मालिकेतील पहिल्या व दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. व या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत कांगारूंवर 13 धावांनी विजय मिळवला आहे.  

AUSvsIND : तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने रचला इतिहास  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात सर्वबाद 289 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे भारताच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड केला आहे. 

1. भारताच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाची सुरवात खराब झाली. भारताची धावसंख्या 26 वर असताना शिखर धवनच्या रूपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. शिखर धवनला अबॉटने अवघ्या 16 धावांवर बाद केले. त्यानंतर युवा शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला  देखील फारशी मोठी कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर देखील आजच्या सामन्यात पुन्हा अपयशी झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला ऍडम झम्पाने लबशेन करवी झेलबाद केले. व केएल राहुल देखील लगेच माघारी परतला. मात्र अशावेळी विराट कोहलीने एका बाजूला खिंड लढवत ठेवली. त्याने 78 चेंडूत 63 धावा केल्या. विराट कोहलीला जोश हेझलवूडने बाद केले.      

2. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी भारताचा धावफलक तीनशेपार पोहचवण्याची कामगिरी केले. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी 150 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची धावसंख्या 302 पर्यंत नेली. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने आज पुन्हा एकदा तडाखेदार फलंदाजी करताना 76 चेंडूत 92 धावा कुठल्या.  

3 भारताने दिलेल्या 303 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात अडखळत झाली. भारताच्या टी नटराजनने लबूशेनला बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. व यासोबतच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिली विकेट त्याने घेतली. ऑस्ट्रेलिया संघाचा नेहमीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त असल्यामुळे डावाची सुरवात फिंच आणि मार्नस लबूशेनने केली होती. त्यानंतर मागील दोन्ही सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला अवघ्या सात धावांवर शार्दूल ठाकूरने माघारी धाडले.  

4. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघातील हेनरिक्स आणि ग्रीन हे देखील फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. हेनरिक्सला 22 धावांवर शार्दूल ठाकूरने शिखर धवन करवी झेलबाद केले. तर 21 धावांवर कुलदीप यादवने ग्रीनला रवींद्र जडेजाकडे झेलबाद केले. व ऍलेक्स कॅरी 38 धावांवर धावबाद झाला. मात्र त्यानंतर मॅक्सवेलने पुन्हा एकदा धावा करण्यास सुरवात केली. आणि त्यामुळे भारतीय संघाची धाकधूक पुन्हा एकदा वाढू लागली होती. पण त्याला जसप्रित बुमराहने रोखले. व यानंतर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित खेळाडू लागोपाठ बाद होत गेल्यामुळे भारतीय संघाला 13 धावांनी विजय मिळवता आला.       

5. ऑस्ट्रेलियाच्या संघाला 303 धावांचे टार्गेट दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात पुनरागमन करतानाच दमदार कामगिरी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आजच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, नवदीप सैनीच्या जागी टी नटराजन आणि चहलऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले होते. जसप्रित बुमराह आणि टी नटराजन या दोघांनीही आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बळी मिळवले. व कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट्स घेतली. तर, भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.   

दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 पहिला सामना मनुका ओव्हल कॅनबेरा येथे 4 डिसेंबर रोजी होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या