सिडनी कसोटीत इतिहास घडणार;  प्रथमच महिला अंपायरच्या भूमिकेत दिसणार 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हा सामना पिंक टेस्ट असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हा सामना पिंक टेस्ट असेल. म्हणजे या सामन्यात डे नाईट कसोटी सामन्याप्रमाणे पिंक बॉल वापरण्यात येणार नसून, लाल बॉलच असणार आहे. मात्र या सामन्यातून मिळणार निधी मॅकग्रा फॉउंडेशनसाठी देण्यात येणार आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर पीडितांना मदत करण्यासाठी ग्लेन मॅकग्राने या संस्थेची सुरवात केली होती. त्यामुळे या सामन्यात मैदानावर सर्व काही पिंक रंगाचे असणार आहे. शिवाय या सामन्यामध्ये पहिल्यांदाच महिला अंपायर अधिकारी असणार आहे.

''बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी'...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या सिडनी कसोटीत क्लेअर पोलोसाक कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अंपायर अधिकारी असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स येथील असलेल्या 32 वर्षीय पोलोसक या सिडनीतील सामन्यात चौथ्या अंपायर अधिकारी म्हणून असणार आहेत. याशिवाय पॉल रिफेल आणि पॉल विल्सन हे मैदानावरील अंपायर असतील. तर ब्रुस ऑक्सनफोर्ड हे थर्ड अंपायर राहणार आहेत. आणि मॅच रेफरी म्हणून डेव्हिड बून असणार आहेत. 

कसोटी सामन्यात चौथ्या अंपायरचे काम नवीन चेंडू देणे, मैदानावरील अंपायरसाठी ड्रिंक्स देणे, तसेच लंच टाईम मध्ये आणि टी ब्रेकच्या वेळी खेळपट्टीची काळजी घेणे आणि लाइटमीटरने लाईट चेक करणे यांचा समावेश असतो. शिवाय काही परिस्थितीत, मैदानावरील अंपायर यांनी माघार घेतल्यास त्यांची जबाबदारी तिसऱ्या अंपायरकडे येते. तर अशावेळी चौथ्या अंपायरला थर्ड अंपायर म्हणून काम पाहावे लागते. त्यामुळे उद्यापासून होत असलेल्या या सामन्यात क्लेअर पोलोसाक या चौथ्या अंपायर अधिकारी असणार आहेत. 

AUSvsIND Pink Test : मास्टर ब्लास्टर सचिनकडून मॅकग्रा फाउंडेशनला खास गिफ्ट

यापूर्वी, क्लेअर पोलोसाक यांनी पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या महिला अंपायर म्हणून कामगिरी केलेली आहे. क्लेअर पोलोसाक यांनी 2019 मध्ये नांबिया आणि ओमान यांच्यातील वर्ल्ड क्रिकेट लीगच्या दुसऱ्या विभागातील सामन्यात अंपायर म्हणून काम केले होते. त्यानंतर आता कसोटी सामन्यात देखील पहिल्या महिला अंपायर म्हणून उतरणार आहेत.    

 


​ ​

संबंधित बातम्या