AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकदिवसीय मालिका काबीज केली.

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकदिवसीय मालिका काबीज केली. मात्र त्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीसहीत गोलंदाजीत देखील दमदार कामगिरी केल्यामुळे 13 धावांनी विजय मिळवला. शिवाय या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या काही खेळाडूंना विश्रांती दिली. व नवीन युवा खेळाडूंना मैदानात उतरवले होते. मात्र या सामन्यात झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने संघाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तिसर्‍या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला बाहेर बसविण्यात आल्यामुळे ब्रेट लीने संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

AUSvsIND : T20 मालिकेत भारत ठरणार वरचढ ?

पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने मालिका होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात फुलफॉर्म मध्ये असलेल्या पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली होती. मात्र हा निर्णय पॅट कमिन्सचा नसावा, असे  ब्रेट लीने म्हटले आहे. कारण बहुतेककरून खेळाडू हे चांगली कामगिरी केल्यानंतर पुन्हा संघाबाहेर बसून विश्रांती घेण्यास तयार नसतात. तसेच केवळ दोन सामने खेळल्यानंतर खेळाडूंनी विश्रांती घेऊ नये, असेही ब्रेट लीने म्हटले आहे. याशिवाय आपला खेळ आणि लय यांच्यात सुधारणा करण्यासाठी खेळाडूंनी जास्तीत जास्त सामन्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत ब्रेट लीने व्यक्त केले. 

याव्यतिरिक्त, एखादा खेळाडू थोडाफार दुखापतग्रस्त झाल्यास त्याने विश्रांती घेणे योग्य आहे. पण खेळाडू दमदार कामगिरी करत असताना त्याने मैदानाबाहेर थांबणे आणि त्यानंतर पुढील सामन्यात पुन्हा मैदानात उतरणे हे त्याच्यासाठी कठीण असल्याचे ब्रेट लीने सांगितले. तसेच असे केल्यामुळे त्या खेळाडूला पुन्हा आपली लय मिळवण्यासाठी झगडावे लागते, असे लीने म्हटले आहे. 

AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथील मैदानावर होणार आहे.             


​ ​

संबंधित बातम्या