AUSvsIND 2 T20 : हार्दिक पंड्याचा निर्णायक तडाखा 

संजय घारपुरे
Monday, 7 December 2020

अखेरच्या षटकात सामना फिरवला; गोलंदाजही मोक्‍याच्या वेळी प्रभावी 

सिडनी : अखेरच्या षटकात धावगती उंचावत होती. भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी 20 मधील विजयासाठी अखेरच्या 12 चेंडूंत 25 धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने त्यातील दहा चेंडू खेळत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत भारतास दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. पंड्याच्या या हार्दिक कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

खरे तर 15 चेंडूत 35 धावांची गरज असताना श्रेयसने तीन चेंडूत एक चौकार आणि एक षटकार खेचत अखेरच्या षटकातील आक्रमणाचा पाया रचला आणि हार्दिकने अखेरच्या षटकात चौदा धावांचे लक्ष्य चार चेंडूतच पार करताना हार्दिकने मिडविकेटला दोन षटकार खेचले होते. हार्दिकच्या अंतिम हल्ल्याचा पाया शिखर धवनच्या धडाकेबाज अर्धशतकाने तसेच नटराजन आणि शार्दूल ठाकूरने ऑस्ट्रेलिया डावात मोक्‍याच्या वेळी धावास वेसण घातल्याने रचला गेला होता. 

पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख गोलंदाजांविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मदार फलंदाजीवर होती. ऍरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियास बदली कर्णधार मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. तो बाद झाला एका गैरसमजुतीने. आपला झेल कोहली घेणार, हे समजून त्याने परतण्यास सुरुवात केली. कोहलीने झेल सोडला; पण वेडला धावचीत केले. 

AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम  

वेड परतल्यावर स्टीव स्मिथला भक्कम साथच लाभली नाही. त्याचे टायमिंगही लौकिकास साजेसे नव्हते. शार्दूल ठाकूर, नटराजन तसेच अखेरच्या षटकातील वीस धावांचा अपवाद वगळता युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियास सव्वादोनशेच्या नजीक जाण्यापासून रोखले. भारतीयांनी सिडनीत क्रिकेटचे धडे गिरवलेल्या ऍबॉटच्या पहिल्या दोन षटकांत 17 धावा वसूल केल्या. वेडने त्यामुळे त्याच्याकडे गोलंदाजीच दिली नाही. त्याचा फायदा हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात घेतला नसता तरच नवल होते. भारताने यामुळे दौऱ्यात सलग तिसरा विजय (एकदिवसीय मालिकेत तिसरा आणि ट्‌वेंटी 20 मध्ये दोन) मिळवला. 

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे प्रमुख खेळाडू नसतानाही आम्ही विजय मिळवत आहोत, हे जास्त सुखावणारे आहे. आयपीएलमधील अनुभवाचा नक्कीच फायदा होत आहे. कमी अंतरावरील सीमारेषा असूनही धावसंख्या आवाक्‍यात ठेवू शकलो. चेंडू फटकावण्याच्या क्षमतेमुळे चार वर्षांपूर्वी हार्दिक संघात आला होता. आता आगामी चार-पाच वर्षे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देऊ शकणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. हार्दिकने एबी डिव्हिल्यर्सच्या शैलीत मारलेला स्कूप जबरदस्तच होता. 
- विराट कोहली, भारतीय कर्णधार 

धावफलक पाहून त्यानुसार खेळणे मला आवडते. ट्‌वेंटी 20 मध्ये फटकेबाजीस जास्त वेळ मिळत असतो. अखेरच्या पाच षटकात यापूर्वी 80-90-100 धावा केल्यामुळे वाढणाऱ्या धावगतीची चिंता नव्हती. खरे तर नटराजन सामनावीर हवा होता. त्याने लक्ष्य आवाक्‍यात ठेवले. 
- हार्दिक पंड्या


​ ​

संबंधित बातम्या