भर मैदानात प्रपोज करणाऱ्या 'दीपेन'ने सांगितली लव्ह स्टोरी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात खेळवण्यात आला.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यानंतर या सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे मालिका गमावण्याची वेळ भारतीय संघावर आली. मात्र हा सामना चालू असताना मैदानात घडलेली घटना ही नक्कीच सर्व क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहील अशी होती. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा एकदा धावांची बरसात केली होती. स्टीव्ह स्मिथने मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत नेण्यात महत्त्वपूर्ण बजावली होती. स्मिथच्या बहरलेल्या खेळीने ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले लक्ष्य भारतीय संघ पार करण्यात अपयशी ठरला. व त्यामुळे भारताला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. परंतु भारतीय संघ फलंदाजी करत असताना मेलबर्नचा रहिवासी असलेल्या भारतीय युवक दीपेन मंडालियाने प्रेयसी विम्बुश हिला प्रपोज केले. आणि तिने देखील यावेळेस होकार दिला. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.      

AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी

त्यानंतर आता दीपेनने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. त्याने याबाबत तीन पोस्ट टाकल्या आहेत. या पोस्टमध्ये दीपेनने, रोज विम्बुशने माझ्या आयुष्यात रंग भरल्याचे म्हटले आहे. शिवाय दोन वर्षांपूर्वी आपण मेलबर्नला शिफ्ट झाल्यानंतर आपण ज्या घरात राहायला सुरवात केली त्यावेळी रोज विम्बुश नावाची मुलगी आपल्याला भेटल्याचे त्याने या पोस्ट मध्ये सांगितले आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर तिची भेट झाल्याचे सांगत सर्वप्रथम एकत्र कॉफी घेतल्याचे त्याने म्हटले आहे. व त्यानंतर एकत्र डिनर घेतल्याचे देखील त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

हार्दिक पांड्याबाबत संजय मांजरेकरांनी घेतला यूटर्न   

तसेच रोज ही सिडनीमधील रहिवाशी असून, मेलबर्न मध्ये आरोग्य व सुव्यवस्थेचे काम पाहत असल्याचे त्याने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. याशिवाय ती देखील क्रिकेटची चाहती असून, सगळ्यात आधी क्रिकेट संबंधितच विषयाने आपले तिच्याशी बोलणे सुरु झाल्याचे दीपेनने म्हटले आहे. शिवाय ती ऑस्ट्रेलिया संघाची चाहती आहे. तर आपल्याला भारतीय संघच आवडतो. आणि या दोघांच्यातील सामन्याच्या निमित्ताने तिला प्रपोज करण्याचे ठरवले होते, असे दीपेनने पोस्ट मध्ये पुढे सांगितले आहे.    

दरम्यान, रोज विम्बुशने दीपेनचे प्रपोज स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे लक्ष याकडे गेले होते. व त्याने देखील मैदानावरून टाळ्या वाजवत या प्रेमी युगलांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले होते. क्रिकेटच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आल्यानंतर असा प्रकार पाहायला मिळाल्याची ही पहिला घटना नाही. यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. याशिवाय कोरोनानंतर क्रिकेटची स्टेडियम प्रेक्षकांसाठी खुली होणारी ही पहिलीच मालिका आहे.


​ ​

संबंधित बातम्या