AUSvsIND 3rd Test : टीम इंडिया सावधान! वॉर्नर कमबॅक करतोय

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी देखील चांगली खेळी केल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी देखील चांगली खेळी केल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर जो बर्न्सला विश्रांती देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. तसेच अजून एक फेरबदल करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियाच्या संघाने म्हटले आहे. 

AUSvsIND 2nd Test : या 5 गोष्टींच्या जोरावर टीम इंडियाने मेलबर्नचे मैदान मारलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू न शकलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेतील सामन्याच्या वेळेस दुखापग्रस्त झालेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तंदरुस्त झाला असून, तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. डेव्हिड वॉर्नर दुखापतीतून सावरला आहे. आणि तो तिसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

अजिंक्यचा खास सन्मान! मानाचं Mullagh Medal पटकावणारा ठरला पहिलाच खेळाडू

याव्यतिरिक्त, मागील काही सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरत असलेल्या जो बर्न्सला देखील तिसऱ्या कसोटी सामन्यात वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जो बर्न्स च्या जागी विल पुकोव्हस्कीला संघात स्थान देण्यात आले आहे. युवा खेळाडू विल पुकोव्हस्की दुखापतीच्या कारणामुळे तो मैदानात उतरू शकला नव्हता. मात्र आता तो पुन्हा फिट झाला असून आगामी कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे ऑस्ट्रलियाच्या संघाने म्हटले आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की मैदानात उतरणार आहेत.   

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान  खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.           


​ ​

संबंधित बातम्या