AUSvsIND : रोहितसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची विनंती  

संजय घारपुरे
Friday, 27 November 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणे रोहित शर्माला शक्‍य होण्यासाठी त्याला विलगीकरणातून सूट देण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, त्यांच्या सरकारला केली आहे.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणे रोहित शर्माला शक्‍य होण्यासाठी त्याला विलगीकरणातून सूट देण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, त्यांच्या सरकारला केली आहे. रोहितची चाचणी 11 डिसेंबरला आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारणे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात रोहित खेळण्यासाठी त्याला विलगीकरणातून सूट देण्याची विनंती भारतीय मंडळाने केली आहे. आता हीच विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सरकारकडे केली आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या व्यक्तीने विलगीकरणातून सूट देण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक असते. कोरोनाचा आपल्यापासून धोका नसेल, याची खात्री त्यांना द्यावी लागते, असे ऑस्ट्रेलिया आरोग्य मंत्रालयाचा नियम आहे.

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करत पांड्याने धोनीला टाकले मागे

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिली कसोटी प्रकाशझोतात घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आग्रही आहे. त्यामुळे ही कसोटी ॲडलेडला न झाल्यास त्यासाठी ब्रिस्बेनचा पर्याय तयार ठेवण्यात आला आहे. दुसरी कसोटी मेलबर्नला असल्याने सलग दोन कसोटी मेलबर्नला खेळवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया तयार नाही. त्याचबरोबर मेलबर्न असलेल्या व्हिक्‍टोरियातील लॉकडाऊन नुकताच उठवण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे.     


​ ​

संबंधित बातम्या