AUSvsIND : वर्णभेदी टिप्पणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संघांमध्ये मागील काही वर्षांपासून मैदानावर खेळासह अनेक वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरवातीला सर्व काही शांततेत पार पडल्यावर पुन्हा एकदा वादाचा भडका उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संघांमध्ये मागील काही वर्षांपासून मैदानावर खेळासह अनेक वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरवातीला सर्व काही शांततेत पार पडल्यावर पुन्हा एकदा वादाचा भडका उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिडनीच्या मैदानावर टीम इंडियाचे खेळाडू जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर प्रेक्षकांकडून वर्णभेदी टिप्पणी केल्याची घटना घडली. या घटनेवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने तपास सुरु केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

AusvsInd : अखेरच्या काही मिनिटांत मिळाले बारा वाजण्याचे संकेत!

भारतीय संघातील खेळाडूंवर वर्णभेदी टिप्पणी झाल्यावर टीम इंडियाने शनिवारी अधिकृत तक्रार नोंदविली होती. या तक्रारी नंतर देखील सिडनीच्या मैदानावरील दर्शकांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजवर अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सिराज आणि भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हे मैदानावरील अंपायर पॉल राफेल यांच्याशी प्रेक्षकांच्या वागण्याविषयी बोलताना दिसले. मैदानावर सिराज सीमारेषेवर थांबलेला असताना प्रेक्षकांनी त्याला उद्देशून काही तरी बोलल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मैदानावरील दोन्ही अंपायर यांनी पोलिसांसोबत बोलत काही दर्शकांना मैदानावरून बाहेर जाण्यास सांगितले. 

त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने या घटनेची चौकशी सुरु केल्याचे सांगितले आहे. याशिवाय दशकांकडून वापरण्यात आलेल्या अपशब्दांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निषेध करत, हे सहन करण्याच्या पलीकडचे असल्याचे म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबतीत निवेदन जारी करण्यात आले असून, यामध्ये एनएसडब्ल्यू पोलिसांनी काही लोकांची चौकशी केली असल्याचे सांगितले आहे. आणि याशिवाय पालिसांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या या निवेदनात नमूद केले आहे. याव्यतिरिक्त, दर्शकांकडून घडलेल्या या चुकीच्या घटनेवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या या प्रसिद्धिपत्रकात भारतीय संघाची माफी मागितली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दुसरा डाव 312 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी कांगारूंकडून 407 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. आणि चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 2 गडी गमावत 98 धावा केलेल्या आहेत. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे क्रिझवर आहेत. तर सलामीवीर रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 31 धावांवर बाद झाले आहेत. रोहित शर्माला पॅट कमिन्सने व शुभमन गिलला हेझलवूडने बाद केले.    


​ ​

संबंधित बातम्या