''आजपर्यंत अशा अफलातून गोलंदाजांचा सामना केला नव्हता''  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने कांगारूंच्या संघाचा 13 धावांनी पराभव केला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने कांगारूंच्या संघाचा 13 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप होण्याची नामुष्की टाळली गेली. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील दमदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. भारताविरुद्धच्या या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने टीम इंडियाच्या फिरकीपटूंचे कौतुक केले आहे. भारतीय फिरकीपटूंविषयी बोलताना अशा गोलंदाजांचा सामना कधीच केला नसल्याचे म्हटले आहे.   

AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

ऑस्ट्रेलियाचा 21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू ग्रीनने कॅनबेरा येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरलेल्या ग्रीनने एकूण 21 धावा केल्या. यावेळेस त्याने एक चौकार आणि एक षटकार देखील लगावला. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघाचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने बाद केले. 

त्यानंतर एका मुलाखती मध्ये ग्रीनने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीची स्तुती केली आहे. आजपर्यंत रवींद्र जडेजा सारख्या दर्जेदार गोलंदाजांचा सामना केला नव्हता, असे ग्रीनने म्हटले आहे. याशिवाय रवींद्र जडेजा हा उत्तम गोलंदाज आहे. आणि सामन्याच्या वेळेस त्याने चेंडू दूर फिरवून फलंदाजाला योग्य रीतीने मागे ठेवण्याचे काम अचूकपणे केल्याचे ग्रीनने सांगितले. त्यामुळे या सामन्यातून बरेच काही शिकता आल्याचे कॅमेरून ग्रीनने नमूद केले. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिका पराभवाची कारणे

याशिवाय फलंदाजी करण्यापूर्वी कॅमेरून ग्रीनने गोलंदाजी देखील केली. ग्रीनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसमोर ही गोलंदाजी केली. त्याबद्दल बोलताना हा सगळ्यात मोठा अनुभव असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच कोहलीला बाद करण्यासाठी गोलंदाजीत बराच बदल केला. मात्र कोहलीने प्रत्येक वेळेस अंदाज घेत खेळी केल्याचे त्याने सांगितले.       


​ ​

संबंधित बातम्या