INDvsAUS : सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान द्यायला हवे होते

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय, टी 20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दोन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुरवातीला रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांची निवड न झाल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली. परंतु सूर्यकुमार यादवला संधी नाकारण्यात आल्यामुळे याबाबतची चर्चा अजूनही चालूच आहे. 

IPL2020 : कोरोनाच्या संकटातही BCCI ने साधली संधी; IPL मध्ये कमावले इतके रुपये   

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत सूर्यकुमार यादव सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आता वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लाराने देखील यासंदर्भात भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यासाठी सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान द्यायला हवे होते, असे मत ब्रायन लाराने व्यक्त केले आहे. लाराने सूर्यकुमार यादवने कौतुक करताना, त्याने दडपणाखाली चांगली फलंदाजी केल्याचे म्हटले आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव हा एक कलात्मक खेळाडू असून, त्याच्याकडे तंत्रपूर्ण खेळी करण्याचे आणि दडपणाखाली खेळण्याचे कौशल्य असल्याचे लाराने म्हटले आहे. 

तसेच सूर्यकुमार यादवने फलंदाजी करताना कोणत्याही क्रमवार येत उत्तम कामगिरी केल्याचे ब्रायन लाराने सांगितले. त्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादव हा रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या दोघांनंतर दमदार व सातत्यपूर्ण खेळी करणारा फलंदाज असल्याचे लाराने म्हटले आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या संघासाठी तो विश्वासार्ह खेळाडू असल्याचे मत लाराने व्यक्त केले. आणि याच कारणामुळे भारतीय संघात सूर्यकुमार यादव फिट बसत असल्याचे करणे सांगितले आहे. 

AUSvsIND : वार्नर म्हणतो; उरले-सुरले दिवस स्लेजिंग न करता खेळणार

दरम्यान, सूर्यकुमारने 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.01च्या सरासरीने 5,326 धावा केल्या आहेत. तर 165 टी 20 सामन्यांमध्ये  32.33 च्या सरासरीने 3,492 धावा केलेल्या आहेत. आणि याशिवाय आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने 16 सामन्यांमध्ये 145.01 च्या सरासरीने 480 धावा कुटल्या आहेत.             


​ ​

संबंधित बातम्या