''पुढच्या सामन्यांमध्ये देखील टीम इंडियाचे अवघडच''

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 21 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागल्यामुळे आणि भारतीय संघाला कसोटीत चांगल्या स्थितीवरून सामना गमवावा लागल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडू ब्रॅड हॅडिनने भारतीय संघाला पिंक बॉल टेस्ट जिंकण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी टीम इंडियाने स्वतःहून गमावली असल्याचे म्हटले आहे. तसेच या सामन्यात भारतीय संघाला आठ विकेट्सने हार मानवी लागल्याने आगामी उर्वरित मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन कठीण असल्याचे ब्रॅड हॅडिनने सांगितले आहे. 

AUSvsIND Boxing Day Test : बॉक्सिंग डे च्या सामनावीराला मिळणार अनोखा बहुमान 

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांवर बाद झाला. आणि त्यामुळे टीम इंडियाला सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. व चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1 - 0 अशी बढत मिळवली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनने दिलेल्या एका मुलाखतीत, भारतीय संघ या पराभवातून सावरत विजयाच्या मार्गावर परत येणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. 

तसेच अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावरची परिस्थिती भारतीय संघाच्या गोलंदाजांसाठी अनुकूल होती. व त्यामुळे या कसोटीत विजय मिळवण्याची एकमात्र संधी भारतीय संघाने गमावल्याचे ब्रॅड हॅडिनने पुढे सांगितले. शिवाय दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांकडून योग्य धावसंख्या उभारून गोलंदाजांनी त्यांचे काम केले असते तर, नक्कीच सामना भारताच्या बाजूने झुकला असता. पण तसे न घडल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. आणि या पराभवाने पुढील सामन्यांमध्ये देखील भारतीय संघ उभारी घेणे अवघड असल्याचे मत ब्रॅड हॅडिनने या मुलाखतीत व्यक्त केले. 

याव्यतिरिक्त, पुढील दोन कसोटी सामने हे भारतीय संघासाठी अनुकूल असलेल्या पिच वर होणार आहेत. तर शेवटचा सामना हा ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. आणि या ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत एकही सामना हरला नसल्याचे ब्रॅड हॅडिनने सांगितले. परंतु सध्याच्या स्थितीनुसार पुढील दोन्ही सामन्यात देखील भारतीय संघ विजय मिळवणे अवघड असल्याचे ब्रॅड हॅडिन म्हणाला. 

मानहानीकारक पराभवानंतर आयपीएस अधिकाऱ्याकडून विराटची पाठराखण 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीला आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन मध्ये खेळवला जाईल.              


​ ​

संबंधित बातम्या