AusvsInd: जाफरनं अंपायरवर साधला मीम्सच्या माध्यमातून निशाणा 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक  4 विकेट घेतल्या. पहिल्या दिवशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिय डावात पंचाच्या निर्णयावरुन वादंग उठल्याचे पाहायला मिळाले. थर्ड अंपायरने घेतलेल्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना जाफरनेही त्यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. त्याने मिम्स शेअर करुन निर्णय चुकीचा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलाय.  

 AusvsInd Boxing Day Test Run Out Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानात रंगला आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी कांगारुंचा खेळ 195 धावांतच खल्लास केला. बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पेननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रणनितीसमोर तो निर्णय व्यर्थ ठरला. दिवसाखेर भारतीय संघाने 1 बाद 36 धावा केल्या होत्या.  

जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक  4 विकेट घेतल्या. पहिल्या दिवशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिय डावात पंचाच्या निर्णयावरुन वादंग उठल्याचे पाहायला मिळाले. थर्ड अंपायरने घेतलेल्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना जाफरनेही त्यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. त्याने मिम्स शेअर करुन निर्णय चुकीचा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलाय.  

AUSvsIND: वसीम जाफरचे कोड लँग्वेज मधील ट्विट होतंय जाम व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 55 व्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर कॅमरुन ग्रीने फटका खेळला. नॉन स्टाइकवर असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 'हा-ना' धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. यष्टीरक्षक ऋषभ पंतने थ्रो पकडत दांड्या विखुरण्याच काम चोख बजावलं. पण तिसऱ्या पंचांनी पेनला नाबाद घोषीत केले.  वसीम जाफरने ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची नाराजी व्यक्त केली आहे. त्याने एक मिम्स शेअर केली आहे. थर्ड अंपायरनी रिप्ले पाहताना असे पाहिले असावे, असे म्हणत त्याने अंपायरची फिरकी घेतली आहे.  

 थर्ड अंपायरने घेतलेल्या या निर्णयाबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नने देखील आश्चर्यचकित झालाय. रिव्ह्यूनंतर पेनला नॉट आउट कसे दिले याचे आश्चर्य वाटते. तो बाद होता अशीच प्रतिक्रिया शेन वॉर्नने दिलीये. या संधीचा पेनला फार फायदा करुन घेत मोठी खेळी करता आली नाही. त्याने 38 चेंडूंचा सामना करुन केवळ 13 धावाच केल्या. 

​ ​

संबंधित बातम्या