बीसीसीआयनं मालामाल केल्यावर आयसीसीनंही केला टीम इंडियाचा सन्मान

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर बीसीसीआयने खेळाडूंना बक्षीस स्वरुपात 5 कोटींची घोषणा केली. त्यानंतर आता आयसीसीनंही भारतीय संघाच्या कामगिरीची अनोख्या पद्धतीने दखल घेतली आहे.

ब्रिस्बेनच्या मैदानात झालेल्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने मजबूत स्थितीत दिसत असलेल्या ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलून दिमाखदार विजय नोंदवला. ज्या मैदानात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवासाच्या अखेरपर्यंत 274 धावा करत टीम इंडियासमोर 328 धावांचा डोंगर ठेवला होता. या धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर भारताचे टेन्शन वाढले होत. भारतीय संघ सामना अनिर्णित राखून मालिका कशी बशी अनिर्णित ठेवू शकेल, असे वाटत होते. पण पंतने दिवसाच्या अखेरच्या षटकात टी-20 स्टाईल फटकेबाजी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.    

Australian Open : 72 खेळाडू लॉकडाऊनमध्ये, रुममध्येच सुरुय ग्रँडस्लॅम जिंकण्याची तयारी

या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत अव्वस्थान पटकावले. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर बीसीसीआयने खेळाडूंना बक्षीस स्वरुपात 5 कोटींची घोषणा केली. त्यानंतर आता आयसीसीनंही भारतीय संघाच्या कामगिरीची अनोख्या पद्धतीने दखल घेतली आहे. आयसीसीने गाबा स्टेडियमवरील बक्षीस समारंभानंतर ट्रॉफीसोबत काढलेला भारतीय संघाचा फोटो आपल्या कव्हर फोटो म्हणून ठेवला आहे. हा एक टीम इंडियाच्या कामगिरीचा मोठा सन्मानच मानावा लागेल. 

ये हिटमॅन का स्टाईल है; रोहितने स्मिथच्या खोडीची केली परतफेड; व्हिडिओ होतोय व्हायरल

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला. तब्बल 32 वर्षांनी हा योग जुळून आलाय. भारतीय क्रिकेट संघाने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर बीसीसीआयनेही संघाला गोड बातमी दिली होती. बीसीसीआयकडून भारतीय संघाला 5 कोटींचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या