AUSvsIND : तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनिश्चितीचे काळे ढग 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पुन्हा काळे ढग दाटले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे तिसरा कसोटी सामना होण्याची शक्यता कमी झाली असून, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

AUSvsIND: किंग कोहली अजिंक्यवर फिदा; नाबाद शतकी खेळीची केली विराट स्तुती

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचे (एमसीजी) मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी संदर्भात बोलताना, सध्यातरी परिस्थिती 50-50 झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच सिडनी येथे तिसरा कसोटी सामना व्हावा अशी इच्छा असली तरी परिस्थिती बिकट बनली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले, न्यू साउथ वेल्स आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी एकत्रित मिळून काम करत असून, मात्र सध्यातरी तिसऱ्या कसोटीवर अनिश्चितीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले आहे.   

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलियात काही भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकारणांमुळे स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. अशातच तिसऱ्या सामन्यानंतर न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने खेळाडूंना ब्रिस्बेन मध्ये येण्यास परवानगी नाकारली तर चौथ्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवण्याची तयारी करण्यात येऊ शकते. अथवा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवण्यात येणाऱ्या मेलबर्न येथेच तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संघांना सिडनीला न जाता शेवटच्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला जाता येईल. 

AUSvsIND: शतकीय खेळी करत अजिंक्यने केली रोहित व मयांक अग्रवालची बरोबरी  

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येत आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीला आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन मध्ये खेळण्याचे नियोजन आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या