AUSvsIND : बॉक्सिंग डे सामन्याच्यापूर्वी अजिंक्य रहाणेचे मोठे वक्तव्य

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया सोबत होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया सोबत होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा मायदेशी परतला आहे. आणि त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून होत असलेल्या बॉक्सिंग डे सामन्याच्यापूर्वी अजिंक्य रहाणेने मोठे वक्तव्य केले आहे. अजिंक्य रहाणेने आगामी कसोटी सामन्यांसाठी आपले लक्ष संघावर राहणार असल्याचे म्हटले आहे. 

''टीम इंडियाच्या विकेटकिपिंग साठी संगीत खुर्ची'' 

ऑस्ट्रेलिया सोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानावर उतरणार आहे. या सामन्याच्या अगोदर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाचा संघ भलेही माईंड गेम असेल, मात्र आपण सगळे लक्ष संघावर केंद्रित केल्याचे म्हटले आहे. याशिवाय विराट कोहली आगामी सामन्यांमध्ये नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कर्णधार म्हणून आपल्यावर अतिरिक्त दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ माईंड गेम खेळण्यात माहीर आहे. त्यामुळे त्यांच्या कडे लक्ष न देता आम्ही आमच्या खेळावर लक्ष देत असल्याचे अजिंक्य रहाणेने सांगितले. 

याशिवाय, भारतीय संघाचे नेतृत्व करणे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे अजिंक्य रहाणे म्हणाला. याव्यतिरिक्त ही एक उत्तम संधी आणि जबाबदारी असून, आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे अजिंक्य रहाणेने नमूद केले. आणि फोकस कर्णधार पदावर नसून, संघावर आहे आणि आम्हाला चांगले खेळ करायचे असल्याचे रहाणे पुढे म्हणाला. तर विराट कोहलीने निघण्यापूर्वी सर्वांसोबत चर्चा देखील केल्याचे अजिंक्य रहाणेने म्हटले. त्यावेळी विराटने सर्वांना एकमेकांसाठी खेळण्यास, एकमेकांच्या यशाचा आनंद घेण्यास आणि एकमेकांना मैदानावर मदत करण्यास सांगितले असल्याचा खुलासा अजिंक्य रहाणेने केला. 

यानंतर, पुढे बोलताना अजिंक्य रहाणेने अ‍ॅडिलेडच्या सामन्यातील केवळ एका तासाच्या खराब कामगिरीने संपूर्ण संघ खराब होत नसल्याचे सांगितले. अ‍ॅडिलेडच्या पहिल्या कसोटीबद्दल पुढे बोलत, ''आम्ही सामन्याच्या पहिले दोन दिवस चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या सुरवातीला एक तास खराब खेळ झाला. आणि त्यामुळे संघाला हार मानावी लागली. पण त्यानंतर आम्ही आत्मनिरीक्षण केले असून, सर्व शक्तीनिशी आगामी सामन्यात खेळणार आहोत,'' असे तो म्हणाला. 

अजिंक्य शांत स्वभावाचा, पण...; वाचा मास्टर ब्लास्टर काय म्हणाला  

दरम्यान, पहिल्या डे नाईट सामन्यात भारतीय संघाला आठ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता उद्या शनिवार पासून दोन्ही देशातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न मध्ये खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा सामना सिडनी आणि चौथा सामना ब्रिस्बेन मध्ये होईल.                    


​ ​

संबंधित बातम्या