AUSvsIND : विराटच्या आक्रमकतेनंतर बीसीसीआयचा रोहितबाबत 'खुलासा'

संजय घारपुरे
Friday, 27 November 2020

रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे, अशी टिपण्णी करतानाच विराट कोहलीने तो संघासोबत ऑस्ट्रेलियास का आला नाही, अशी विचारणा केल्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने खुलासा केला आहे.

मुंबई : रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे, अशी टिपण्णी करतानाच विराट कोहलीने तो संघासोबत ऑस्ट्रेलियास का आला नाही, अशी विचारणा केल्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने खुलासा केला आहे. वडील आजारी असल्यामुळे रोहितने अमिरातीहून थेट ऑस्ट्रेलियास जाणे टाळले, असे मंडळाने सांगितले. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारणे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येस रोहितबाबतचा संभ्रम संघासाठी योग्य नव्हे, असे सांगताना कोहलीने ज्याप्रमाणे वृद्धिमान साहाची पुनर्वसन प्रक्रिया ऑस्ट्रेलियात सुरू आहे, तसेच रोहित आणि इशांत शर्माबाबत होऊ शकले असते, असे सांगितले होते. विराटच्या या टिपण्णीनंतर भारतीय मंडळाने गुरुवारी मध्यरात्री याबाबत पत्रक काढत खुलासा केला. 

AUSvsIND थट्टामस्करी चालेल, शिवीगाळ नकोच

रोहितच्या तंदुरुस्तीची चाचणी 11 डिसेंबरला होईल आणि त्यानंतर त्याच्या कसोटी सहभागाबाबत निर्णय होणार असल्याचे कळवले आहे. रोहितच्या वडिलांची प्रकृती चांगली नव्हती, त्यामुळे त्याने अमिरातीहून मायदेशी परतण्याचे ठरवले. आता त्याचे वडील ठीक आहेत. त्यामुळेच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया घेत आहे, असेही मंडळाने कळवले आहे. 

इशांत शर्मा कसोटी मालिकेबाहेर 
इशांत शर्मा दुखापतीतून सावरू शकलेला नाही. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुपलब्ध असेल, असेही  मंडळाचे सचिव जय शाह यांनी पत्रकात म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या