Test Cricket Record : संदीप पाटील-कपिल पाजींच्यानंतर शार्दुल-वॉशिंग्टन जोडी ठरली हिट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

या दोघांनी वैयक्तिक खेळीच्या विक्रमासह जोडीनं एक खास विक्रमही ब्रिस्बेनच्या मैदानात नोंदवला. सातव्या विकेटसाठी परदेशातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा पराक्रम शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केला

Test Cricket Record  : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेनमधील निर्णयाक कसोटी सामन्यातील तिसरा दिवस वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने गाजवला. या जाडीनं 123 धावांची शतकी भागीदारी करुन अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला बाहेर काढले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर त्यांनी केलेली खेळी ही अवस्मरणीय खेळीच्या यादीत जमा होणारी आहे. शार्दुल ठाकूरसह वॉशिंग्टन सुंदरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशत झळकावले.

या दोघांनी वैयक्तिक खेळीच्या विक्रमासह जोडीनं एक खास विक्रमही ब्रिस्बेनच्या मैदानात नोंदवला. सातव्या विकेटसाठी परदेशातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा पराक्रम शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केला. यापूर्वी 1982 मध्ये संदीप पाटील (129)* आणि कपिल देव (65)* 65 यांनी 50 + धावांची भागीदारी केली होती. मँचेस्टरच्या मैदानातील या भागीदारीनंतर 38 वर्षानंतर कसोटी सामन्यात सातव्या विकेटने 50 + धावा केल्या.  

Aus vs Ind 4th Test Day 3 : शार्दुल-वॉशिंग्टन जोडीची 'सुंदर' खेळी

वॉशिंग्टन सुंदरने 144 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. त्याने 108 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट घेणारा भारताचा तो दुसरा खेळाडू आहे.  यापूर्वी दत्तु फडकर यांनी 1947-48 ऑस्ट्रेलिविरुद्द सिडनीच्या मैदानात पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी 51 धावा आणि 14 धावा खर्चून 3 विकेट मिळवल्या होत्या
 


​ ​

संबंधित बातम्या