AusvsInd : दुखापतीचं ग्रहण भारताच्या विजयाआड येणार नाही; अख्तरची 'बोलंदाजी'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

भारताने ज्यापद्धतीने  सिडनी कसोटीत खेळ केला त्यामुळे भारतीय संघावर अधिक भरवसा वाटतो, असा उल्लेखही अख्तरने केला आहे. भारतीय संघ ब्रिस्बेनचे मैदान मारुन मालिका खिशात घालेल, असा विश्वास अख्तरने व्यक्त केलाय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलय. पहिल्या कसोटीपासून संघातील एक-एक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडत राहिला. आता अखेरच्या  कसोटीपूर्वी रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी या दोन अष्टपैलूंसह प्रमुख गोलंदाज असलेला बुमराहही बाहेर पडलाय. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीनंतर आता उरलेल्या शिलेदारांना घेऊन अजिंक्य रहाणेला ब्रिस्बेनचा किल्ला लढवायचा आहे. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या बाजून बोलंदाजी केलीय. भारतीय संघातील खेळाडूंना झालेल्या दुखापतीनंतरही संघात ब्रिस्बेनचे मैदान मारण्याच क्षमता आहे, असे अख्तरने म्हटले आहे. 

भारताने ज्यापद्धतीने  सिडनी कसोटीत खेळ केला त्यामुळे भारतीय संघावर अधिक भरवसा वाटतो, असा उल्लेखही अख्तरने केला आहे. भारतीय संघ ब्रिस्बेनचे मैदान मारुन मालिका खिशात घालेल, असा विश्वास अख्तरने व्यक्त केलाय. भारतीय संघाचा जो स्वभाव आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीम इंडिया ऐतिहासिक कामगिरी करुन कांगारुना पराभवाचा धक्का देईल, असे अख्तरने म्हटले आहे.  

'अनफिट' पुकोवस्कीचा पार्टनरच बनला पेन टीमच्या वेदनेवरील 'मलम'

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेत 3 सामन्यानंतर दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत. त्यामुळे ब्रिस्बेनच्या मैदानात होणारा चौथा आणि अखेरचा सामना निर्णायक असणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्की चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे भारतीय संघातून हनुमा विहारी, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंशिवाय टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे. 

ब्रिस्बेनचे मैदान ऑस्ट्रेलियासाठी बाल्लेकिल्लाच मानला जातो. बऱ्याच वर्षांपासून या मैदानात कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळालेले नाही. सिडनीमध्येही ऑस्ट्रेलियाची कामगिरी अतिशय उत्तम होती. मात्र याठिकाणी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला जिंकू न देता सामना अनिर्णित करण्यात यश मिळवले. त्यामुळे आगामी कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ नाव इतिहास रचण्यासाठी सज्ज असेल.


​ ​

संबंधित बातम्या