रनमशिन विराटच्या विक्रमी खेळीनंतर विक्रमादित्य सचिन ट्रेंडिगमध्ये

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

विराटच्या खेळीचं चाहते विराट कसा भारी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर फॉरेव्हर सचिन फॅन तेंडुलकरच बेस्ट असल्याचा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीचा दाखला देत विराट भारी ठरतोय, असा सांगण्याचा प्रयत्न एका कोहली चाहत्याने केला आहे. कोहलीच्या 'विराट' खेळीनंतर सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

sachin tendulkar vs virat kohli who is better ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 23 धावा करताचा मैलाचा पल्ला पार केला. अवघ्या 242 डावात त्याने हा 12 हजारीचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. सचिनने हा टप्पा पार करण्यासाठी 300 वेळा फलंदाजी केली होती. विराट कोहलीच्या या खेळीनंतर पुन्हा एकदा सर्वोत्तम फलंदाज कोण? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

विराटच्या खेळीचं चाहते विराट कसा भारी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर फॉरेव्हर सचिन फॅन तेंडुलकरच बेस्ट असल्याचा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीचा दाखला देत विराट भारी ठरतोय, असा सांगण्याचा प्रयत्न एका कोहली चाहत्याने केला आहे. कोहलीच्या 'विराट' खेळीनंतर सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

एका नेटकऱ्याने सचिनची 1994 ते 1999 ची वनडेतील आकडेवारी शेअर केली आहे. यात सचिनचा स्ट्राइक रेट 90 पेक्षा अधिक असल्याचे सांगत त्याने सचिनची कामगिरीशी कोणाचीही तुलना करता येऊ शकत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आणखी एकाने 1998 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या 7 सामन्यांची आकडेवारी शेअर करत 7 पैकी 6 सामन्यात सचिन सामनावीर ठरल्याचे सांगत सचिनच भारी असल्याचा दावा केल्याचेही पाहायला मिळते.

​ ​

संबंधित बातम्या