ये हिटमॅन का स्टाईल है; रोहितने स्मिथच्या खोडीची केली परतफेड; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

स्मिथने सिडनी कसोटी सामन्यात केलेल्या खोडीची चांगलीच चर्चा रंगली होती. 

AUS vs IND 4th Test: ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्माने फिल्डवर  स्मिथला चिमटा काढणारे कृत्य केले. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या या कृतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लंचपूर्वी  भारताचा सलामीवीर आणि उप-कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) ला चिडवल्याचे पाहायला मिळाले. क्रीजवर रोहितने केलेल्या प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

रोहित क्रीजमध्ये मुद्दाम शॅडो प्रॅक्सिट करताना दिसला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकरात लवकर गुंडाळून खेळायला उत्सुक असल्याचा त्याचा तोरा स्मिथला डिवचणारा होता. यापूर्वी सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथने पंत बॅटिंग करत असताना गार्ड मार्कची खो़डी चांगलीच चर्चेत आली होती. याचीच परतफेड रोहितने ब्रिस्बेन कसोटीमध्ये केल्याचे बोलले जात आहे. बहुतेक रोहित स्टीव स्मिथला चिडवण्याचा प्रयत्न करतोय, असे काँमेंट्री करताना संजय मांजरेकरही म्हणाले आणि काँमेंट्री बॉक्समध्ये एकच हास्या पिकला.

Australia vs India 4th Test Day 4 : सामन्यात पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलिया मोठे टार्गेट देण्याच्या दिशेनं 

ऑस्ट्रेलियाने चौथ्या आणि निर्णायक सामन्यातील पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 336 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने 33 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून 275 + धावांची बढत घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्मिथने अर्धशतकी खेळी केली. 

AUS vs IND : रोहितचा 'बेफिक्रे' अंदाज अन् दुसऱ्या दिवशीच्या पाच मोठ्या गोष्टी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने दिमाखात पदार्पण करत मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली. सिडनी कसोटीसह मालिका हातून निसटणार असे चित्र असताना हनुमा विहारी आणि अश्विनने सामना अनिर्णित राखत मोलाची कामगिरी केली आणि मालिका आता निर्णायक सामन्यापर्यंत पोहचली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या