सिडनीत वाढतोय कोरोना; रोहित अपार्टमेंटमधील 2 बेडरुमध्ये क्वारंटाईन

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

सध्याच्या घडीला सिडनीमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढताना दिसत असून सिडनीत नियोजित सामना मेलबर्नला घेण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. सिडनीतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने डेविड वॉर्नर (David Warner) आणि शॉन एबॉट (Sean Abbot) यांना मेलबर्नला बोलवून घेतले आहे. 

AUS  vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा (India Cricket Team) सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस टेस्ट पास करुन ऑस्ट्रेलियात रवाना झाला आहे. पण क्वारंटाईनच्या नियमावलीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीलाही मुकावे लागणार आहे. क्रिकेट जगतात हिटमॅनच्या नावाने ओळखल्या जाणारा रोहित शर्मा सध्याच्या घडीला सिडनीमधील 2 बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये क्वारंटाईन आहे. रोहित या रुमच्या बाहेर पडू शकत नाही.  

स्पोट्र्स टूडेच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा त्याच्या रुममध्ये वर्कआउट आणि टिव्ही पाहूनच दिवस घालवत आहे. 26 डिसेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या सामन्यास रोहित शर्मा मुकणार आहे. त्यानंतरचा तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात रंगणार असून या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकेल. 

''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू घ्यावा''

सध्याच्या घडीला सिडनीमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढताना दिसत असून सिडनीत नियोजित सामना मेलबर्नला घेण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. सिडनीतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने डेविड वॉर्नर (David Warner) आणि शॉन एबॉट (Sean Abbot) यांना मेलबर्नला बोलवून घेतले आहे. 

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासह सिडनी आणि ब्रिस्बेन येथे होणाऱ्या उर्वरित सामन्यात टीम इंडियाला नियमित कर्णधार कोहलीशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. त्याच्या उपस्थितीत पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सनी पराभव स्विकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 36 धावात गारद झाला होता.  
 
​ ​

संबंधित बातम्या