पंत 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार; तिसरे टेस्ट शतक 3 धावांनी हुकलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

पुजारासोबत त्याने 148 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात आणले.

AusvsIND : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सिडनीच्या मैदानातील दुसरे आणि परदेशातील तिसरे शतक झळकावणार, असे वाटत असताना लायनने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पंतचे कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने 118 चेंडूत 97 धावांची खेळी केली. पहिल्या तीसएक चेंडूत 5 धावा करणाऱ्या पंतने 64 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. पुजारासोबत त्याने 148 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात आणले. मात्र त्याची विकेट पडल्यामुळे टीम इंडिया पुन्हा दबावात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या मैदानातर पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करणारा तो पहिला आणि एकमेव यष्टीरक्षक आहे. इंग्लंड दौऱ्यावर पंतने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावताना त्याने 117 चेंडूचा सामना केला होता. अदिल राशीदच्या चेंडूवर षटकार खेचत त्याने शतक साजरे केले होते.  

AusvsInd Brisbane Test News : ट्विस्ट संपले; चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्येच!

भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा संकटात सापडला. पण पंतला बढती देण्याचा प्लॅन यशस्वी ठरला. संयमी खेळी करणाऱ्या पुजारासोबत पंत आक्रमक शैलीत खेळला आणि सामना रंगतदार परिस्थितीत पोहचला. शतकाच्या उंबरठ्यावर आलेल्या पंतची लायनने शिकाल केली आणि सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजून वळवला. 
 


​ ​

संबंधित बातम्या