माझा विश्व-विक्रम मोडण्याची क्षमता केवळ अश्विनमध्येच : मुरलीधरन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

मुरलीधरन म्हणाले की, अश्विन एक महान गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेटचा आपला रेकॉर्ड मागे टाकण्याची त्याच्याकडे संधी आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही युवा खेळाडूला हा पराक्रम शक्य होईल, असे वाटत नाही, असेही मुरलीधरन यांनी सांगितले. सध्याच्या घडीला लायन विकेट घेत आहे. तो 400 विकेटच्या जवळ आहे. पण मोठा पल्ला गाठण्याची त्याला खूप सामने खेळावे लागतील.  

AusvsInd  : श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने भारतीय फिरकीपटू अश्विनसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. अश्विनमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 700-800 विकेट घेण्याची क्षमता असल्याचे मुरलीधरन यांनी म्हटले आहे. यावेळी प्रतिस्पर्धी संघातील नॅथन लायनमध्ये इथपर्यंत मजल मारणे शक्य नाही, असे ते म्हणाले.  

मुरलीधरन म्हणाले की, अश्विन एक महान गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेटचा आपला रेकॉर्ड मागे टाकण्याची त्याच्याकडे संधी आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही युवा खेळाडूला हा पराक्रम शक्य होईल, असे वाटत नाही, असेही मुरलीधरन यांनी सांगितले. सध्याच्या घडीला लायन विकेट घेत आहे. तो 400 विकेटच्या जवळ आहे. पण मोठा पल्ला गाठण्याची त्याला खूप सामने खेळावे लागतील.  

AusvsInd : दुखापतीचं ग्रहण भारताच्या विजयाआड येणार नाही; अख्तरची 'बोलंदाजी'

दिग्गज फिरकीपटू लायनसंदर्भात शेन वॉर्ननेही भविष्यवाणी केली आहे. लायन फिट राहिला तर कसोटी क्रिकेटमध्ये तो 600-650 विकेट मिळवू शकेल. जर तो फिटनेस राखू शकला तर ऑस्ट्रेलियाकडून तो पुढील पाच वर्षात कमीत कमी 50 सामने खेळू शकतो, असे वॉर्न यांनी म्हटले आहे. 50 कसोटीत लायनमध्ये 200-250 विकेट घेण्याची ताकद असल्याचे वॉर्न यांना वाटते.  

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आघाडीवर आहे. त्यांच्या नावे 800 बळींची नोंद आहे. या यादीत शेन वॉर्न 708 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. यांच्यापाठोपाठ भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेंचे नाव येते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 619 गड्यांना बाद केले आहे. अश्विनने आतापर्यंत 74 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 377 विकेट आहेत.  

​ ​

संबंधित बातम्या