AusvsInd Record : अजिंक्य दिग्गजांच्या पक्तींत; टीम इंडियाची द. आफ्रिकेसोबत बरोबरी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता अजिंक्य रहाणेचाही समावेश झालाय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यातील पहिल्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ सावरणार का? हो मोठा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना आणि समीक्षकांनाही पडला होता. विराटच्या अनुपस्थितीत मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आणखी वाढले. पण कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक नेतृत्व शैली आणि संयमी फलंदाजीमुळे टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली. मेलबर्न कसोटी सामन्यातील दिमाखदार विजयानंतर ऑस्ट्रेलियात भारताने सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही नोंदवला आहे

भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 24 सामने खेळले आहेत. यातील भारताचा हा पाचवा विजय ठरला. दक्षिण अफ्रिकेनं यापूर्वी 5 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 24 पैकी  12 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असून 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियात 15 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 5 विजय 7 पराभव तर 3 सामन अनिर्णित राहिले आहेत. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम करण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.

ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता अजिंक्य रहाणेचाही समावेश झालाय. 1977 मध्ये बिशन सिंग बेदींच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला 222 धावांनी पराभूत केले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली 1978 मध्ये टीम इंडियाने सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला 1 डाव 2 धावांनी पराभूत केले होते.  

1981 मध्ये सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्नच्या मैदानात रंगलेला कसोटी सामना 59 धावांनी जिंकला होता. 2003 मध्ये भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवून दिले. एडलेडमधील कसोटी सामन्यात भारताने 4 विकेट्सनी जिंकला होता. 2008 मध्ये अनिल कुंबळेंच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थमध्ये 72 धावांनी विजय नोंदवला होता. 2018 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताने दोन कसोटी सामने जिंकले होते. एडलिडच्या मैदाना टीम इंडियाने 31 तर मेलबर्नच्या मैदानात 137 धावांनी दमदार विजय नोंदवत मालिकाही जिंकली होती. अजिंक्यच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मेलबर्नमध्ये भारताला आणखी एक विजय मिळवून दिला. 
 


​ ​

संबंधित बातम्या