AusvsInd: शिवराळ जंटलमन; वॉर्न-सायमंड्स कॉमेंट्री बॉक्समध्ये मर्यादा विसरले (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कामगिरीशिवाय वादग्रस्त वक्तव्यानेही वॉर्न नेहमीच चर्चेत असायचा. निवृत्तीनंतरही त्याच्याकडून असे प्रकार अजूनही सुरुच असल्याचे या प्रकरावरुन दिसून येते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी खेळाशिवाय समालोचकांची चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न आणि अँड्र्यू सायमंड्स यांनी नवा वाद ओढावून घेतलाय. रेकॉर्डिंग सुरु असताना त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन याच्याविरोधात अपशब्दांचा वापर केला. हे दोन्ही खेळाडू शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये कमेंट्री करताना दिसले. लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु आहे याची कल्पना नसताना त्यांनी सिडनी कसोटीवर चर्चा करताना लाबुशेनविरुद्ध अपशब्द वापरले. 

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कामगिरीशिवाय वादग्रस्त वक्तव्यानेही वॉर्न नेहमीच चर्चेत असायचा. निवृत्तीनंतरही त्याच्याकडून असे प्रकार अजूनही सुरुच असल्याचे या प्रकरावरुन दिसून येते. लाबुशेनला उद्देशून वापरलेल्या शब्दांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर प्रसारणाचे अधिकार असलेल्या कायो स्पोर्ट्सने याप्रकरणी माफीही मागितली आहे.  

AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

लाबुशेनवर भडकली वॉर्न-सायमंड्स जोडी

बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात सामना सुरु होण्यापूर्वी समालोचन कक्षात (कॉमेंट्री बॉक्स) वॉर्न-सायमंड्स यांच्यात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीवर चर्चा सुरु होती. यावेळी या दोघांनी लाबुशेन विरुद्द अपशब्द वापरले. त्याला सल्ला देताना जे शब्द वापरण्यात आले ते लिहणेही लज्जास्पद ठरेल.

सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात लाबुशेननं 91 धावांची खेळी केली. याशिवाय दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अर्धशतकी खेळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रसारण वाहिनीने कोणतेही कारण न देता माफी मागितली आहे. आमची लाईव्ह स्ट्रीम सुरु झाली होती. यावेळी काही अपशब्दाचा वापर झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात आम्ही माफी मागतो, असे कायो स्पोर्ट्सने म्हटले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या