AusvsInd Brisbane Test News : ट्विस्ट संपले; चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्येच!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

ब्रिस्बेनमध्ये पुन्हा क्वारंटाईनला टीम इंडियातील सदस्य तयार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर क्वीसलंड सरकारने नियम पाळायचे असतील तरच खेळायला या, असा इशाराच टीम इंडियाला दिला होता.

India tour of Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासंदर्भातील संभ्रम अखेर मिटला आहे. ठरल्याप्रमाणे अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या मैदानातच खेळवण्यात येईल. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 15 ते 19 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. आठवड्याभरापासून या सामन्याच्या नियोजनाबद्दल एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड यांच्यात सामना ठरल्याप्रमाणे खेळण्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले आहे.  

ब्रिस्बेनमध्ये पुन्हा क्वारंटाईनला टीम इंडियातील सदस्य तयार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर क्वीसलंड सरकारने नियम पाळायचे असतील तरच खेळायला या, असा इशाराच टीम इंडियाला दिला होता. त्यानंतर या कसोटी सामन्यासंदर्भात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सामना संपल्यानंतर लवकरात लवकर संघातील खेळाडूंना शहरातून बाहेर पडण्याची परवानगी मिळावी, असेही बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

वर्णभेदाचा खेळ : ''तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम''

गुरुवारी क्वीन्सलंड सरकारने 72 तास कठोर निर्बंध लादले होते. ब्रिस्बेन परिसरात नव्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या एक रुग्ण आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात खबरदारीसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले असले तरी मंजूर केलेल्या क्वारंटाईन प्लॅनिंगनुसार चौथा कसोटी सामना खेळवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला परवानगी दिल्याची माहितीही क्वीन्सलंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली होती.  


​ ​

संबंधित बातम्या