AUSvsIND : हार्दिक पांड्यानं घेतला अंगलट येईल असा धाडसी निर्णय

सकाळ ऑनलाईन
Sunday, 29 November 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मयांक अगरवालने एका षटकात 10 धावा खर्च केल्यानंतर पर्यायी गोलंदाजांची भूमिका बजावण्यासाठी पांड्याने चेंडू हाती घेतला. मागील सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीनं पर्यायी गोलंदाजांची उणीव भासल्याचे म्हटले होते.

India vs Australia 2nd ODI Match भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं आश्चर्यकारक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. पाठीच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेनंतर मैदानात उतरल्यापासून पांड्या गोलंदाजी करताना दिसलेला नाही. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात त्याने एकही चेंडू टाकला नाही. एवढेच नाही तर गोलंदाजी करणार नाही, असे विधानही त्याने केले. होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीची तमा न बाळगता गोलंदाजी करताना त्याने एक महत्त्वपूर्ण विकेटही घेतली.  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मयांक अगरवालने एका षटकात 10 धावा खर्च केल्यानंतर पर्यायी गोलंदाजांची भूमिका बजावण्यासाठी पांड्याने चेंडू हाती घेतला. मागील सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीनं पर्यायी गोलंदाजांची उणीव भासल्याचे म्हटले होते.

AUSvsIND Record : टीम इंडियातील गोलंदाजांच्या फ्लॉपशोची 'पंचमी'

या सामन्यातही तेच चित्र पाहायला मिळाले. शेवटी हार्दिक पांड्याकरून गोलंदाजी करुन  घ्यावी लागली. त्याने 4 षटकात 24 धावा खर्च करुन स्मिथची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. ही विकेट मिळाली नसती तर ऑस्ट्रेलियाने 400 चा आकडा नक्कीच पार केला असता असे स्मिथची बॅटिंग पाहताना वाटत होते. 

AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

सध्याच्या घडीला भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे दोन अष्टपैलू प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. पहिल्या सामन्यात पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. प्रमुख गोलंदाजीची मदार असलेल्या बुमराहला म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. याशिवाय शमी, नवदीप सैनी आणि चहल यांचा संघात समावेश आहे. हे गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर कोणत्याही प्रकारचे दडपण टाकू शकले नाहीत. 


​ ​

संबंधित बातम्या