नट्टूचं यशस्वी पदार्पण, वॉर्नर खास स्वप्नपूर्तीस मुकला!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

आयपीएलच्या जोरावर टी-नटराजन याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर वॉर्नरने नटराजनचे अभिनंद केले होते. नट्टू आपण आता ऑस्ट्रेलिया भेटू असे वॉर्नरने म्हटले होते. नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहण्याची वॉर्नरची इच्छापूर्ण झाली असली तरी त्याला मैदानात भेटण्याचं त्याच स्वप्न अधूरेच राहिले आहे.

इंडियन प्रीमीयर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादच्या संघातून खेळलेल्या टी. नटराजनने भारतीय संघात पदार्पण केले. लाबुशेनच्या रुपात ऑस्ट्रेलियन संघाला धक्का देत त्याने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या वनडे सामन्यात वॉर्नरला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो तिसऱ्या वनडेसह आगामी टी-20 मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे वॉर्नरच्या ऐवजी तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करण्यासाठी फिंचसोबत लाबुशेन आल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलच्या जोरावर टी-नटराजन याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर वॉर्नरने नटराजनचे अभिनंद केले होते. नट्टू आपण आता ऑस्ट्रेलिया भेटू असे वॉर्नरने म्हटले होते. नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहण्याची वॉर्नरची इच्छापूर्ण झाली असली तरी त्याला मैदानात भेटण्याचं त्याच स्वप्न अधूरेच राहिले आहे.

टी नटराजन याने ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी लवकर फोडली. हा भारतीय संघाच्या विजयातील मोठा टर्निंग पॉइंट आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात संघातील बदल आणि नटराजनने मिळालेल्या संधीच केलेलं सोन यामुळे टीम इंडियाने व्हाईट वॉश टाळण्यात यश मिळवले. वनडेतील आपला पहिला सामना खेळणाऱ्या नटराजनने 10 षटकांच्या कोट्यात 70 धावा खर्च करुन दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या.

शेवटच्या क्षणी घातक ठरु शकेल असे वाटत असलेल्या एगरलाही नटराजनने बाद केले. ही विकेटही भारतीय संघालाच्या विजय मिळवून देण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण ठरली. नटराजन याने दोन विकेटशिवाय एख मेडन ओव्हर देखील टाकल्याचे पाहायला मिळाले. 

​ ​

संबंधित बातम्या