AusvsInd : या 3 गोष्टींमुळं दुसऱ्या दिवशी टीम इंडिया ठरली भारी!
एडलेड आणि मेलबर्न या दोन खेळपट्या गोलंदाजांसाठी नंदवन ठरल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही सामन्यात धावा करणे फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने कसोटीचं होती. पण आता दोन सामन्यानंतर अखेर फलंदाजांना फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी दिसली.
पहिल्या दिवस पाऊस आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय खेळाडूंनी जादू दाखवली. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संघाने रडत खडत 300 + धावांचा टप्पा पार केला. स्मिथमुळं यजमानांना हे शक्य झाले. जाणून घेऊयात दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने कोणत्या गोष्टी केल्या ज्यामुळे दिवसाअखेर टीम इंडिया फ्रंटफूटवर दिसली.
बॅटिंग पिचवर कांगारुंच्या संघाच्या दिग्गज फलंदाजांना रोखून दाखवलं
एडलेड आणि मेलबर्न या दोन खेळपट्या गोलंदाजांसाठी नंदवन ठरल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही सामन्यात धावा करणे फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने कसोटीचं होती. पण आता दोन सामन्यानंतर अखेर फलंदाजांना फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी दिसली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्लॅनही केला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास 35 षटके वाया गेल्यानंतर यजमानांनी दिवस गाजवला. पण दुसऱ्या दिवशी लाबुशेनची विकेट पडली आणि सामन्याला पुन्हा वेगळे वळण आले. भारतीय संघातील गोलंदाजांनी झटपट विकेट घेतल्या. स्मिथ वगळता अन्य कोणलाही भारतीय गोलंदाजांनी सेट होऊ दिले नाही. ही गोष्ट भारतीय संघाच्या फायद्याची ठरली.
सलामीवीरांनी दमदार सुरुवात करुन दिली
ऑस्ट्रेलियन संघाला 338 धावांवर रोखल्यानंतर भारतीय सलामी जोडी किती धावा करणार? याकडे सर्वांचे लक्ष्य होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीनं संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली. या मालिकेत पहिल्यांदाच भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन्ही कसोटी सामन्यात सलामी जोडी अपयशी ठरली होती. रोहित-शुभमनने पहिल्या विकेटसाठी 70 धावा ठोकल्या. त्यांनी आक्रमक अंदाजात फलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अचूक टप्प्यावर मारा करण्यात अपयश आले. रोहित शर्मा (26) आणि शुभमन गिल 50 धावा करुन परतले. ही जोडी तंबूत परतली असली तरी त्यांनी भारतीय संघावरील दबाव निश्चितच कमी केला आहे.
दिवसाअखेर अजिंक्य-पुजारा नाबाद परतले
दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 2 बाद 96 धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ दाखवला. या दोघांनी 13 षटक आणि 5 चेंडू खेळताना केवळ 11 धावांची भागीदारी केली. ही खेळी रटाळवाणी असली तरी दिवसाअखेर विकेट न पडल्यामुळे दिवस भारतीय संघाच्या नावे राहण्यास मदत झाली.