Record : 3 सामन्यांची T20 मालिका विराटने कधीच गमावलेली नाही

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 11 वेळा तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे. यापैकी एकदाही कोहली सेनेनं पराभव पाहिलेला नाही. आस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे टी-20 मधील रेकॉर्ड दमदार असेच आहे. तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 11 वेळा तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे. यापैकी एकदाही कोहली सेनेनं पराभव पाहिलेला नाही. आस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

2017 मध्ये पहिल्यांदा कोहलीने टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडला 2-1 असे नमवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. 2018 मध्ये खेळवण्यात आलेली ऑस्ट्रेलिया विरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. यात भारतीय संघाने  4-0 असा विजय नोंदवला होता.  
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या कामगिरीवर एक नजर 

AUSvsIND : चहलला खेळवणं नियमात बसत नव्हतं; पण...

2-1 विरुद्ध इंग्लंड (2017)
1-1 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2017)
2-1 विरुद्ध न्यूझीलँड (2017) 
2-1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (2018) अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.  
2-1 विरुद्ध इंग्लंड  (2018)
1-1 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2018) 
3-0 विरुद्ध  वेस्ट इंडीज  (2019)
1-1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2019) 
2-1  विरुद्ध वेस्ट इंडीज (2019) 
2-0  विरुद्ध श्रीलंका (2020) 
4-0 विरुद्ध न्यूझीलंड (2020) 
 
​ ​

संबंधित बातम्या