AusvsInd : घरच्या मैदानात कांगारुंवर 20 वर्षानंतर पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत यजमान ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले .

Australia vs India, 2nd Test : पिंक बॉलवर भारतीय संघाची दैना करणाऱ्या कांगारुंची मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच दैना झाली. पहिल्या डावात 195 धावात आटोपलेला यजमान संघ दुसऱ्या डावात 200 धावांपर्यंतच मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या डावातील धावांची सरासरी ही 1.93 इतकी अल्प होती. घरच्या मैदानावरील त्यांची आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. 1978-79 नंतर

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत यजमान ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले . चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियान 6 बाद 133 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. या धावसंख्येत अवघ्या 67 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा संघ  200 धावांत आटोपला.  ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 धावा केल्या होत्या. त्यानंतर बॅटींग करताना टीम इंडियाने 326 धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (112), रविंद्र जडेजा (57) आणि शुभमन गिल (45) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रित बुमराह, आर, अश्विन, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. तर उमेश यादवला एक यश मिळाले.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. सिराजने त्याची विकेट घेतली. सलामीवीर मॅथ्यू वेडने 40 धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. लाबुशेन 28, कमिन्स 22, ट्रॅविस हेड 17, हेजलवूड 10 तर स्टार्क 14 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय अन्य खेळाडू एकांकी धावसंख्या करुन तंबूत परतले. 

सलामीवर बर्न्स अवघ्या 4 धावा करुन परतला. भरवशाच्या स्टीव्ह स्मिथला दुसऱ्या डावातही संघाला सावरण्यासाठी मैदानात तग धरता आला नाही. तो अवघ्या 8 धावा करुन बाद झाला. जसप्रित बुमराहने त्याला बोल़्ड केले. कर्णधार पेन अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. लायनला कशाबशा 3 धावा करता आल्या. वेडने 40 धावा करण्यासाठी 137 चेंडू खेळले. तर ग्रीनने त्याच्यापेक्षा अधिक चेंडू खेळून   45 (146) धावा केल्या. कमिन्सने 103 चेंडूचा सामना करुन 22 धावा केल्या, स्टार्कने 56 चेंडू खेळण्याची क्षमता दाखवून 14 धावा केल्या.
 


​ ​

संबंधित बातम्या