बंद पिंजऱ्यात अडकलेला शेर टीम इंडियावर तुटून पडेल; टॉम मूडींना विश्वास

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

स्मिथ हा बरेच दिवस कसोटी क्रमवारीत टॉपला होता. एका वर्षाच्या बंदीच्या काळानंतरही त्याने हे स्थान टिकवून ठेवले होते. वनडेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या. पण ...

Australia vs India 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांनी भारताला दबावात आणणारे वक्तव्य केलय. स्टीव्ह स्मिथ हा पिंजऱ्यात बंद असलेला शेर असून तो दमदार खेळी करण्यासाठी तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत नाव असलेला स्मिथ पहिल्या दोन कसोटी सामन्यात सपशेल फेल ठरला होता. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने केवळ 10 धावा केल्या आहेत. सिडनी कसोटीत त्याच्या भात्यातून मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, असा विश्वास टॉम मूडी यांनी व्यक्त केलाय.  

''भारतीय गोलंदाजांसमोर धावा करणे कठीण''

त्याचा रेकॉर्ड बोलका आहे. चांगल्या कामगिरीची गॅरेंटी देता येत नसते. पण नव्या वर्षात स्मिथचा धमाका दिसेल, असा विश्वास त्यांना वाटतो. मोठी धावसंख्या करुन तो स्वत:ला सिद्ध करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.  विलियमसन, कोहली आणि स्मिथ यांच्यासंदर्भात नेहमी चर्चा रंगत असते. ही चर्चा कायम रहावी हे डोक्यात ठेवूनच तो खेळेल, असेही त्याने म्हटले आहे. 

पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात केन विलियमसने द्विशतकी धमाका केला. त्यापूर्वी बॅक टू बॅक शतकी खेळीनं आयसीसीच्या कसोटी क्रमावारीत त्याने विराट आणि स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथ हा बरेच दिवस कसोटी क्रमवारीत टॉपला होता. एका वर्षाच्या बंदीच्या काळानंतरही त्याने हे स्थान टिकवून ठेवले होते. वनडेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या. पण कसोटीत तो गडबडल्याचे पाहायला मिळाले. परिणामी ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढल्या. स्मिथला रोखून भारतीय संघ मालिकेतील विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक असेल.

AusvsInd : सिडनीच्या मैदानात आतापर्यंत कोण ठरलंय भारी; जाणून घ्या रेकॉर्ड

या लढाईत कोण जिंकणार आणि आघाडी घेणार हे पाहणे रोमांचित असेच असेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरा सामना सिडनीच्या मैदानात रंगणार आहे. पिंक चेंडूवर पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्नचे मैदान मारलं होतं. कामगिरीत सातत्य राखून मालिकेत आघाडी घेण्यासाठी संघ उत्सुक असेल. दुसरीकडे स्मित खराब कामगिरी विसरुन नव्या वर्षात नवी सुरुवात करुन नावाला साजेसा खेळ करण्यासाठी प्रयत्नशील निश्चितच दिसेल. 


​ ​

संबंधित बातम्या