कठीण परिस्थितीत 'सुंदर' रिझल्ट! गोलंदाजीनंतर वॉशिंग्टन फलंदाजीतही चमकला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

गोलंदाजीत धमक दाखवल्यानंतर ज्यावेळी फलंदाजीला नंबर आला तेव्हा त्याने फलंदाजीतील कसबही दाखवून दिले.

नेटमधून थेट कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीनंतर फलंदाजीतील आपली क्षमता दाखवून देत कसोटीत पास झालाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णयाक कसोटी सामन्यात त्याने 108 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 186 धावांवर अर्धा संघ तंबूत परतला असताना वॉशिंग्टन सुदर आणि शार्दुल ठाकूर यांनी शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघा एक वनडे सामना खेळून 1 विकेट घेणाऱ्या आणि टी-20 मध्ये आपली खास छाप सोडणाऱ्या वॉशिंग्टनला संघाच्या ताफ्यातील दुखापतीमुळं प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अश्विनला तिसऱ्या कसोटीनंतर पाठदुखीचा त्रास उद्भवला. त्याची जागा भरुन काढण्यासाठी मर्यादित षटकानंतर नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत समावेश करत वॉशिंग्टनला थांबवण्यात आले. 

Aus vs Ind 4th Test Day 3 : शार्दुल-वॉशिंग्टन जोडीची 'सुंदर' खेळी

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. यात त्याने पदार्पणातील पहिली शिकार स्टिव्ह स्मिथला केले. त्यानंतर सेट झालेल्या कॅमरुन ग्रीनला आणि लॉवर ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याची क्षमता असलेल्या लायनच्या रुपात त्याने तिसरे यश मिळवले होते. गोलंदाजीत धमक दाखवल्यानंतर ज्यावेळी फलंदाजीला नंबर आला तेव्हा त्याने फलंदाजीतील कसबही दाखवून दिले.


​ ​

संबंधित बातम्या