AusvsInd "क्रिकेटच्या प्रेमात कोरोनाच्या जाळ्यात अडकायचे नाही"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

सामना सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मास्क काढू नये. ज्यावेळी तुम्ही काही खात किंवा पित असाल त्याच वेळी मास्क काढा, अशा सूचना प्रेक्षकांना देण्यात आल्या आहेत.

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणाऱ्या सामन्याची सर्वांच उत्सुकता आहे. सिडनीच्या मैदानात दोन्ही संघ मालिकेत आघाडी मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दोन्ही संघातील सामन्यातील रंगत पाहण्यासाठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तत्पर्वी न्यू साउथ वेल्स आरोग्य मंत्रालयाने स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी  कठोर नियम लागू  केला आहे.

सामना सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मास्क काढू नये. ज्यावेळी तुम्ही काही खात किंवा पित असाल त्याच वेळी मास्क काढा, अशा सूचना प्रेक्षकांना देण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात एका प्रेक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. यापार्श्वभूमीवरच सिडनी कसोटी पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मास्क वापरण्यासंदर्भात कठोर नियम लागू करण्यात आला आहे

. ''बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी''

ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत असले तरी सिडनीच्या मैदात रंगणारा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी 10,000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामना पाहत असताना आता या प्रेक्षकांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आला आहे.यासंदर्भात न्यू साउथ वेल्सचे आरोग्यमंत्री ब्रॅड हेजार्ड म्हणाले की, आपण सर्वच क्रिकेटवर खूप प्रेम करतो. क्रिकेटच्या प्रेमापोटी कोरोनाच्या जाळ्यात अडकणार नाही, यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. कसोटी सामन्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागाची यादी तयार करण्यात आली आहे. ज्या भागात प्रादुर्भाव आहे त्या भागातील कोणत्याही चाहत्याला स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 


​ ​

संबंधित बातम्या