AusvsInd : आरे बाबांनो ऑस्ट्रेलियासोबत रन आउटची स्पर्धा कशाला? जाणून घ्या रेकॉर्ड

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

मागील 20 वर्षात एका कसोटी सामन्यात तीन जण रन आउट होण्याची ही तिसरी वेळ ठरली.

AusvsInd 3rd Test : सिडनी कसोटीत कमालीचा चढ-उतार पाहायला मिळत आहे. पहिला दिवस ऑस्ट्रेलियन संघाने गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने हिट शो दाखवला. मात्र तिसऱ्या दिवशी संघ पुन्हा बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा पहिला डाव  अवघ्या 244 धावांत आटोपला. तिसऱ्या दिवसात भारतीय संघाने 150 धावांत 8 विकेट गमावल्या.  यात 3 फलंदाज धावबाद झाले.

मागील 20 वर्षात एका कसोटी सामन्यात तीन जण रन आउट होण्याची ही तिसरी वेळ ठरली. अष्टपैलू हनुमा विहारी, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्या रुपात भारताने तीन विकेट धावबादच्या स्वरुपात फेकल्या. 2008 नंतर पहिल्यांदाच संघातील ताळमेळ अशा प्रकारे ढासळल्याचे पाहायला मिळाले.

Image

मोहालीच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग रन आउट झाले होते. हा सामना अनिर्णित राहिला होता.  2001 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यातही तीन गड्यांनी रन आउटच्या रुपात विकेट फेकली होती. द्रविड, कैफ आणि एस दीघे यांनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात धावबाद झाले होते.

Image

AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

Image

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावबादचा लाजीरवाणा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 8 वेळा ऑस्ट्रेलियन फलंदाज 3 पेक्षा अधिक वेळा रन आउट झाले आहेत. भारत आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 7 कसोटी सामन्यात भारतीय संघाने 3 पेक्षा अधिक गडी धावबाद झाले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या