कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी; सचिनचा खास रेकॉर्ड टाकला मागे

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

विराट कोहलीने 242 व्या डावात 12 हजार धावांचा पल्ला पार केलाय. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 300 वेळा बॅटिंग केल्यानंतर हा पल्ला गाठला होता. या यादित ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने  314 डावात 12 हजार धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा संगकारा 336, सनथ जयसूर्याने 379 आणि जयवर्धनेला हा पल्ला गाठण्यासाठी  399 वेळा फलंदाजीला यावे लागले होते.  

Virat Kohli Record भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. शिखर धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने  23 धावा करताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. एबॉटच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत त्याने वनडे सामन्यात सर्वात जलद  12 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. 

पॅटर्निटी लीववर 'विराट' चर्चा, गावसकरांचा मास्टर स्ट्रोक तर कपिल पाजींची गुगली...

विराट कोहलीने 242 व्या डावात 12 हजार धावांचा पल्ला पार केलाय. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 300 वेळा बॅटिंग केल्यानंतर हा पल्ला गाठला होता. या यादित ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने  314 डावात 12 हजार धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा संगकारा 336, सनथ जयसूर्याने 379 आणि जयवर्धनेला हा पल्ला गाठण्यासाठी  399 वेळा फलंदाजीला यावे लागले होते.  

AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे 

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात  कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली होती. त्याने 87 चेंडूत  89 धावा केल्या. या सामन्यात 78 धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 22 हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम विराटच्या नावे झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 22 हजार धावांचा टप्पा पार करणारा तो  पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर आता अखेरच्या सामन्यात कोहलीने आणखी एक विराट विक्रम आपल्या नावे केला. 

​ ​

संबंधित बातम्या