#36AllOut : विकेट पडल्या की फेकल्या; तुम्हीच बघा आणि ठरवा (Video)

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

भारतीय संघाने कांगारुंसमोर कशी शरणागती पत्करली त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एकापाठोपाठ एक हजेरी लावून फलंदाजात तंबूत परतताना दिसते. सोशल मीडियावर भारतीय संघातील खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या 27 धावात भारतीय संघाने 8 गडी गमावले. मोहम्मद शमी रिटायर हर्ट झाल्यामुळे भारताचा डाव 9 बाद 36 वर संपुष्टात आला. आतापर्यंची भारताची कसोटीतील ही सर्वोच्च निच्चांकी धावसंख्या आहे. 

सोशल मीडियावर भारतीय संघाच्या कामगिरीची जोरदार टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाने पिंक बॉलवर सर्जिकल स्टाईक केले, अशा आशयाचे ट्विट व्हायरल होत आहेत. विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीने विकेट पडत होत्या. बातम्या वाचताना काही चाहत्यांना विश्वासही बसला नसेल की टीम इंडियाची अवस्था एवढी बिकट आहे. एखाद्या जुन्या मॅचची विकेट पडलेला रिकॅप शो दाखवला जातो तशी पद्धतीने भारताच्या विकेट पडत होत्या. 

AUS vs IND : 9 8 4 4 4 2 0 0 0 4 मोबाईल नंबर नव्हे.. हे तर टीम इंडियाचं स्कोअरकार्ड!

भारतीय संघाने कांगारुंसमोर कशी शरणागती पत्करली त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एकापाठोपाठ एक हजेरी लावून फलंदाजात तंबूत परतताना दिसते. सोशल मीडियावर भारतीय संघातील खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. भारताचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनंही भारताच्या कामगिरीची खिल्ली उडवली आहे. त्यांचे ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या