तुला परत मानलं रे ठाकूर! मराठमोठ्या शार्दुलसाठी विराटचं पुन्हा मराठीत ट्विट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

शार्दुल ठाकूरने  115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले अर्धशतक ठरले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियातील पहिल्या डावात 3 विकेटही मिळवल्या होत्या. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या निर्णयाक कसोटी सामन्यात दमदार खेळी करुन संघाचा डाव सावरणाऱ्या शार्दुल आणि वॉशिंग्टनचे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने  कौतुक केले आहे. या जोडीनं 123 धावांची भागीदारी केल्यामुळे टीम इंडियाने 300+ धावा केल्या. दोघांच्या खेळीवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कसोटी पदार्पणात वॉशिंग्टन सुंदरने केलेली खेळी कौतुकास्पद आहे, असे विराट कोहलीने म्हटले आहे. वाशिंग्टनसोबत त्याने शार्दुल ठाकूरचही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेत त्याने शार्दुलला शाब्बासकी दिली. तुला परत मानलं रे ठाकूर असा उल्लेख त्याने ट्विटमध्ये केलाय. 

Aus vs Ind 4th Test Day 3 : शार्दुल-वॉशिंग्टन जोडीची 'सुंदर' खेळी

यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देणारी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने शार्दुलचं मराठीत कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. विंडीजने भारताला 315 धावांचे लक्ष्य दिले होते. विराट कोहली बाद झाल्यानंतर सामना विंडीजच्या बाजूने झुकतोय असे वाटत होता. 18 चेंडूत 22 धावांची आवश्यकता असताना शार्दुलने जडेजाच्या साथीनं भारताला विजयी मिळवून देणारी खेळी केली होती.

सातव्या विकेटसाठी परदेशातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा पराक्रम शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केला. यापूर्वी 1982 मध्ये संदीप पाटील (129)* आणि कपिल देव (65)* 65 यांनी 50 + धावांची भागीदारी केली होती. मँचेस्टरच्या मैदानातील या भागीदारीनंतर 38 वर्षानंतर कसोटी सामन्यात सातव्या विकेटने 50 + धावा केल्या. 

शार्दुल ठाकूरने  115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले अर्धशतक ठरले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियातील पहिल्या डावात 3 विकेटही मिळवल्या होत्या. 


​ ​

संबंधित बातम्या