पांड्याची गाडी नव्वदीतच अडकली; पहिल्या ODI शतकाची प्रतिक्षा कायम

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

हार्दिक पांड्याने जडेजाच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 150 धावांची नाबाद भागीदारीही रचली. भारताकडून या क्रमांकावर झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागीदारी आहे. 2015 मध्ये रायडू बिन्नी जोडीनं झिम्बाब्वे विरुद्ध विक्रमी 160 धावांची भागीदारी केली होती (सहाव्या विकेटसाठी). हरारेच्या मैदानात हा विक्रम रचला गेला होता. युवराज-धोनी यांनी 2005 मध्ये 158 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिक पांड्याच्या भात्यातून दोन अर्धशतके निघाली. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात नर्व्हस नाईंटीचा शिकार झालेल्या हार्दिक पांड्याला तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातही नव्वदीच्या घरातच थांबावे लागले. परिणामी वनडेतील पहिल्या शतकाची त्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कॅनबराच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने 76 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी केली. आपल्या धमाकेदार खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार खेचला.

सीडनीच्या मैदानातील सामन्यातील 31 चेंडूतील 28 धावा वगळता सलामीच्या सामन्यातही पांड्याने 90 धावांची दमदार खेळी केली होती. कमालीचा योगायोग म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याने 76 चेंडूचा सामना केला. पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्यात त्याने दोन धावा अधिक काढून नाबाद राहिला पण शतकाला आठ धावा कमी पडल्या. नाबाद 92 धावा ही वनडे कारकिर्दीतील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. 

कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी; सचिनचा खास रेकॉर्ड टाकला मागे

हार्दिक पांड्याने जडेजाच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 150 धावांची नाबाद भागीदारीही रचली. भारताकडून या क्रमांकावर झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागीदारी आहे. 2015 मध्ये रायडू बिन्नी जोडीनं झिम्बाब्वे विरुद्ध विक्रमी 160 धावांची भागीदारी केली होती (सहाव्या विकेटसाठी). हरारेच्या मैदानात हा विक्रम रचला गेला होता. युवराज-धोनी यांनी 2005 मध्ये 158 धावा केल्या होत्या. 

रनमशिन विराटच्या विक्रमी खेळीनंतर विक्रमादित्य सचिन ट्रेंडिगमध्ये​

हार्दिक पांड्या  दुसऱ्या वनडेत फलंदाजीत फारशी चमकदार कामगिरी करु शकला नव्हता. पण या सामन्यात त्याने गोलंदाजीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले. पाठिच्या दुखापतीनंतर गोलंदाजी करण्यास प्राधान्य देणार नसल्याचे त्याने म्हटले होते. पण संघ संकटात असल्यामुळे त्याने गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला. प्रतिस्पर्धी संघातील फार्मात असलेल्या स्मिथला त्याने तंबूत धाडले होते.  

​ ​

संबंधित बातम्या