ICC WTC : एक नंबर! कांगारुंची शिकार टीम इंडियाच्या वाघांनी किवींना टाकेल मागे

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

2019-21 च्या हंगामातील 5 मालिकेत भारतीय संघाने 9 विजय मिळवले आहेत. 3 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असून सिडनीतील एका अनिर्णित राहिल्या सामन्याचा यात समावेश आहे.

ICC World Test Championship  : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अवघ्या 36 धावांत आटोपलेल्या टीमनं दुखापतीच्या ग्रणातून मार्ग काढत ब्रिस्बेनचे मैदान मारले. मेलबर्नमधील कमबॅक आणि ब्रिस्बेनमधील दिमाखदार विजायानंतर आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानावर पोहचली आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला 430 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झालाय.

2019-21 च्या हंगामातील 5 मालिकेत भारतीय संघाने 9 विजय मिळवले आहेत. 3 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असून सिडनीतील एका अनिर्णित राहिल्या सामन्याचा यात समावेश आहे. टीम इंडियाचे विनिंग पर्सेंटेज 71.7 टक्के इतके आहे. न्यूझीलंडचा संघ 420 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 5 मालिकेत 7 विजय मिळवले असून 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Aus vs Ind , 4th Test : अजिंक्य सेनेनं अभिमानाने मिरवला तिरंगा; पाहा ऐतिहासिक क्षणाचे खास फोटो

ऑस्ट्रेलियन संघ 332 (69.2 टक्के) गुणासह तिसऱ्या, इंग्लंड 352 (65.2 टक्के) गुणासह चौथ्या स्थानावर आहे. विजयाच्या टक्केवारीतील फरकामुळे इंग्लंडच्या संघापेक्षा ऑस्ट्रेलिया संघ सरस ठरला आहे. दोन्ही संघात 3 टक्के एवढे अंतर आहे.  दक्षिण आफ्रिका 144 (40 टक्के) पाकिस्तान 166 (30.7 टक्के), श्रीलंका 80 (19.0 टक्के), वेस्ट इंडिज 40 (11.1 टक्के) या संघाचा क्रमांक लागतो. बांगलादेशने अद्याप खातेही उघडलेले नाही.


​ ​

संबंधित बातम्या