भारत दौऱ्यात तू शेवटची टेस्ट खेळशील; स्लेजिंग करणाऱ्या पेनला अश्विननं दिलं चॅलेंज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

ऑस्ट्रेलियन कर्णधार पेनने विकेटमागून स्लेजिंग केल्यानंतर अश्विने त्याला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पेन-अश्विन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Aus Vs Ind  3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिला. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) या जोडीने चिवट खेळी करुन भारतीय संघाचा पराभव टाळण्यात मोलाचा वाटा उचलला. ही जोडी ज्यावेळी सेट झाली तेव्हा कांगारुनीं त्यांचा चिडखोरवृत्ती दाखवून दिली. गोलंदाज अपयशी ठरत असताना ऑस्ट्रेलियन संघाने या दोघांच्या विरोधात स्लेजिंगचा खेळ सुरु केला. ऑस्ट्रेलिया कॅप्टन टीम पेन यात आघाडीवर होता. 

ऑस्ट्रेलियन कर्णधार पेनने विकेटमागून स्लेजिंग केल्यानंतर अश्विने त्याला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पेन-अश्विन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. लायनच्या गोलंदाजी दरम्यान हा सर्व प्रकार घडला. तिसरा सामना जिंकणार नाही हे लक्षात आल्यानंतर पेनने ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी उत्सुक असल्याचा टोमणा रविचंद्रन अश्विनला लगावला. यावर अश्विननेही जबऱ्या रिप्लाय दिला. तू भारत दौऱ्यावर येण्याची मी वाट बघेन, एवढेच नाही तर कदाचित भारत दौऱ्यातील कसोटी सामना तुझ्यासाठी शेवटचा ठरेल, असे चॅलेंजच अश्विनने दिले. 

Tim Paine: "can't wait for the Gabba Test".

Ravi Ashwin: "Can't wait to see you in India, that'd be your last series."#INDvAUS #AUSvsIND #Dravid #Draw #Vihari #Aussie #SydneyTest #Pujara #Paine #Cheater #aussies #Ashwin #TheWall #TestCricket #Wade #Jadeja pic.twitter.com/y2otkj2lFi

 (@_iamvish) January 11, 2021

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर कधी येणार तेव्हा हे शाब्दिक युद्ध पुन्हा पाहायला मिळेलच. पण आता मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कांगारु वर्सेस भारतीय वाघांचे तेवर बघण्यासारखे निश्चितच असणार आहेत. चौथ्या कसोटीत या दोघांच्यात सामना रंगण्याचे संकेतच या घटनेनं दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यातील मालिकेत सध्याच्या घडीला दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला असून मालिका जिंकण्यासाठी पुढचा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ब्रिस्बेनच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाचे रेकॉर्ड अत्यंत चांगले आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात कशी कामगिरी करणार? हे पाहणे उत्सुकतेचे असेल. 


​ ​

संबंधित बातम्या